kinwat today news

महाराष्ट्राला दर महिन्याला १० हजार कोटी द्या: अजित पवार

करोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी महाराष्ट्राला मोठ्या आर्थिक आधाराची गरज आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा १० हजार कोटींचे अनुदान दिले जावे, आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय तूटीची मर्यादा ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला कराव्या लागणारा खर्चाचा पाढाही वाचला आहे.

वरळीतून श्रीवर्धनला गेलेल्या व्यक्तीला करोना

रायगड जिल्ह्यात आज करोनाचे पाच नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. करोनाने आज जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रवेश केला असून श्रीवर्धनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

करोनामुळे विश्वविजेत्या खेळाडूचे निधन

गेल्या आठवड्यामध्ये हंटर यांना करोना व्हायरसची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज, शुक्रवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडच्या फुटबॉल वर्तुळाची हानी झाल्याचे म्हटले जात आहे.

BCG मुळे करोना होत नाही? बघा काय आहे सत्य

बीसीजी लस जन्मताच दिली जात असल्याने करोनाने भारतातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे, असे दावे सोशल मीडियातून केले जात आहेत. त्यावर आयसीएमआरच्या डॉक्टरांनी उत्तर दिलंय. बीसीजीची लस जन्मताच देण्यात येत असली तरी अजून क्षय रोगाचा धोका आपल्याला टाळता आलेला नाही. नव्या विषाणुंमुळे क्षय रोगचा धोका कमी झालेला नाही. पण बीसीजीमुळे कॅन्सरच्या काही रुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढल्याचं काही संशोधनातून समोर आलंय.

मी जायरा वसीम नव्हे, धमक्यांना घाबरत नाही!

बबीताने ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला. ‘तबलिगी जमात’च्या तिच्या वक्तव्यावर विरोध करणाऱ्यांवर बबीताने एका व्हिडिओच्या माध्यमातून हल्ला चढवला. मी जायरा वासीम नाही आणि कोणत्याही प्रकारच्या धमक्यांनी घाबरणार नाही.

हे वाचाच! आयेशा टाकिया आणि फरहान आझमी यांची कोरोनाच्या लढ्यात मोठी मदत!

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी नामवंत चेहरे समोर येत आहेत. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. भारताची स्थिती गंभीर होत चालली आहे. या विषाणूला संपवण्यासाठी अनेक कलाकार पुढे आहे आहेत. यामध्ये कोणी आर्थिक मदत करत आहे तर कोणी अन्न-धान्य आणि खाद्य पदार्थांची मदत करत आहेत. याशिवाय काहींनी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केली आहे. तर काहींनी आपले हॉटेल, ऑफिस डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खानने बृहन्मुंबई महानगर पालिकेला त्यांची वांद्रे येथील चार मजली वैयक्तिक ऑफिस क्वारंटाइन सेंटर म्हणून दिली असल्याचे सांगितले होते. याशिवाय अभिनेता सोनू सूदने देखील त्याच जुहू येथील हॉटेल डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफसाठी दिले आहे. या यादीमध्ये आता अभिनेत्री आयेशा टाकिया आणि तिचा पती फरहान आझमी यांचेही नावं जोडले गेले आहे. आयेशा आणि फरहानने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. 
 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयेशा आणि फरहानने बृहन्मुंबई महानगर पालिकेला (बीएमसी) त्यांचं दक्षिण मुंबईतील कोलाबा येथील ‘गल्फ’ हे हॉटेल क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यास दिले आहे. आता त्यांचं ‘गल्फ’ हे हॉटेल महानगर पालिका क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरणार आहेत. फरहानने याची माहिती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. ‘ ‘गल्फ’ हॉटेलला स्टँडिंग ओवेशन दिले पाहिजे कारण हे हॉटेल कठीण परिस्थितीत नेहमीच लोकांच्या मदतीसाठी उभ असतं. १९९३ साली झालेल्या दंगलीच्या वेळी धारावी, प्रतीक्षानगर आणि इतर ठिकाणची लोक इथे राहिले होते आणि आता जे आपापल्या या कोरोना विषाणूच्या संकटातून वाचवत आहेत त्यांच्या मदतीसाठी हे हॉटेल तत्पर आहे. ‘ अशी पोस्ट फरहानने शेअर केली आहे.

Aisha Takia and Farhan Azmi assist the Municipal Corporation

पोलिसांनी लढवली नामी शक्कल अन् कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे झाले सोपे…

रायबाग (बेळगाव) – तालुक्यातील कुडची येथे कोरोनाने थैमान घातले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे या लोकांना त्वरित शोधण्यासह बंदोबस्तात निटनेटकेपणा येण्यासाठी कुडची येथे नामी शक्कल लढविण्यात आली आहे. त्यासाठी येथे या आधी काम केलेल्या पोलिसांना ड्युटीवर बोलावले आहे.

 

कुडची हे शहर कोरोनामुळे धास्तावले आहे. निगेटिव्ह  अहवाल आलेल्यांचे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून तातडीने अलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यात नवीन पोलिस ड्युटीवर दिल्यास पत्ता शोधताना अडचणी येऊन कामास विलंब होऊ शकतो. शहराची संपूर्ण माहिती असल्यास बंदोबस्तातही कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळेच या आधी काम केलेल्या पोलिसांना ड्युटी दिल्याने कामे वेगाने होण्याची संधी साधण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची भेट घेऊन दिवसभरातील कामाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जात आहे.

 

वाचा – आता बेळगावात या ठिकाणी होणार कोरोनाची तपासणी…

कुडचीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्याचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कमल पंत यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश व कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड चोख सेवा बजावत आहेत.

पोलिसांचे महत्व अधोरेखित

कोरोनाला रोखण्यात पोलिस खात्याकडून चांगलेच सहकार्य मिळत आहे. लॉकडाउन, सीलडाउन, बंदोबस्त, आरोग्य सर्वेक्षण यासह विविध कामांना हातभार लागत आहे. त्यामुळे त्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

‘कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कुडचीत सीलडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याने या आधी काम केलेल्या पोलिसांची मदत होत आहे. आपण देखील येथे काम केल्याने जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयातून ड्युटीवर आलो आहोत.’
जी. एस. उप्पार,
पोलिस उपनिरीक्षक

अहो, कर्नल साहेब तुम्ही चक्क शिलाई मशीन वर कसे…?

कोल्हापूर – देशाची सेवा युद्धाच्या काळात रणगाडा चालवुनही करता येते आणि देशांतर्गत संकटाच्या काळात शिलाई मशीन चालवुनही करता येते याचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन निवृत्त कर्नल अमरसिंह सावंत यांनी घडवले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नातील एक अनोखा खारीचा वाटा कर्नल सावंत यांनी उचलला आहे.

तीस वर्ष भारतीय सैन्यदलात रणगाडा विभागात कार्यरत असलेले कर्नल सावंत निवृत्तीनंतर शाहू नाक्याजवळील दादू चौगुले नगर मध्ये राहतात. लष्करातील सेवेच्या काळात त्यांच्या रणगाडा विभागाने वेगवेगळ्या मोहिमेत सहभाग घेतला. त्याचा थरारक अनुभव कर्नल सावंत यांच्या गाठीशी आला. आता ते निवृत्त झाले आहेत. पण देशसेवेची रग आजही अंगात कायम आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तयार झालेले वातावरण पाहता प्रत्येक स्तरावर को रोमा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या वातावरणात गप्प घरात बसून राहतील तर ते कर्नल सावंत कसले? त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला व कोरोना संसर्ग रोखण्याच्या मोहिमेत एक निवृत्त कर्नल म्हणून कोणतीही जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली.

वाचा – पोस्ट खाते आले आंबाप्रेमींच्या मदतीला धावून ; पोस्टाने घरपोच मिळणार आंबा…

प्रशासन जरूर अशा व्यक्तींना या कामात सामावून घेणार आहे पण त्याला काही कालावधी जाणार आहे. यादरम्यान कर्नल सावंत यांनी थांबून न राहता त्यांनी आपल्या परीने कोरोना संसर्ग रोखण्याचा एक भाग म्हणून मास्क शिवायचे ठरवले. त्यांनी घरातील जुने शिलाई मशीन तेलपाणी करूनव्यवस्थित बनवले. मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने घरात काही कपडे शिल्लक होते. मग हे कर्नल साहेब चक्क शिलाई मशीन वर बसले. त्यांच्या पत्नी सुधा व त्यांचा एक सहकारी हे दोघे मास्कच्या आकाराचे कापड कापून देऊ लागले. आणि लष्करातील सेवेच्या काळात रणगाडा चालवणारे कर्नल सावंत चक्क शिलाई मशीन चालवू लागले. हे तिघे जण मिळून दिवसभरात ही चाळीस मास्क बनवतात. मग कर्नल साहेब हे मास्क घेऊन शाहू नाक्याजवळ जातात. तेथून जाणाऱ्या कोणाच्या तोंडावर मास्क नाही त्याला आपल्याजवळचा मास्क मोफत देतात. मास्क काढायचा नाही असा सल्ला देतात. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे किंवा पडावेच लागले तर तोंडाला मास्क बांधणे, जंतुनाशक वापरणे हेच मार्ग आहे. आणि आपण आपल्या परीने जे करता येईल ते करण्याचा एक भाग म्हणून कर्नल सावंत व त्यांच्या परिवाराने हा मार्ग स्वीकारला आहे. कर्नल सावंत यांना शिलाई मशीन वर बसलेले पाहून अनेक जण कर्नल साहेब तुम्ही चक्क शिलाई मशीन वर कसे? असे विचारतात पण देशावर एक आपत्ती असताना कोणतेही काम करण्यास आपण पण मागेपुढे पहायचे नसते या भावनेतून त्यांचा परिवार या कामात गुंतला गेला आहे
 

मी जरूर लष्करातून कर्नल पदावरून निवृत्त झालो आहे. निवृत्तीचे जीवन अगदी व्यवस्थित जगत आहे. मी व माझा परिवार घरी सुरक्षित राहू शकतो. पण मी ठरवले, या काळातही माझ्याकडून देशाची सेवा व्हावी म्हणून मी शिलाई मशीन वर बसून मास्क शिवत आहे. रणगाडा चालवणे जशी देश सेवा आहे तशी या कोरोना संसर्गाच्या काळात शिलाई मशीन चालवून मास्क बनवणे ही देखील देश सेवाच आहे

कर्नल अमरसिंह सावंत

अभिनेत्री गिरीजा ओकचा 'क्वार्टर' लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई- सध्या जमाना डिजिटलचा आहे. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग वेबसीरिज पाहण्यातच आता दंग असतो. अगदी कमी कालावधीत उत्तम कंटेन्ट, फुल टू मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं.  लघुपटाचे देखील अगदी तसेच आहे. लघुपटही अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. थोड्याशा कालावधीत बरेच काही सांगून जातात हे लघुपट. त्यांच्या विषय आणि आशयामध्ये एवढी ताकद नक्कीच असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जुन्या मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिज पाहण्यात दंग आहेत. शिवाय उत्तमोत्तम लघुपटही प्रेक्षक पाहत आहेत. अशातच आणखी एक लघुपट युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

हे ही वाचा: प्रेक्षकांची नस ओळखलेली एकता कपूर लॉकडाऊनमध्येही स्वस्थ बसलेली नाही 

नवज्योत बांदिवडेकरने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. नवज्योतने याआधी बऱ्याच लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच बऱ्याच लघुपटांच्या तांत्रिक बाजूही त्याने सांभाळल्या आहेत. त्याने तयार केलेला ‘क्वॉर्टर’ या लघुपटाने बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारली आहे. या लघुपटाची कथा अश्विनी नावाच्या महिलेभोवती फिरणारी आहे. तिच्या जीवनात अनेक चढउतार आलेले असतात आणि त्या सगळ्या संकटांचा सामना करता करता ती व्यसनाच्या कधी अधीन होते हे तिचे तिलाच समजत नाही. त्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडते.

डाॅक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होतात. त्यातच डाॅक्टर तिला व्यसनाधीन स्त्री म्हणून सर्टिफिकेट देतात. एके दिवशी दिवाळीच्या रात्री तिच्या घरात ती एकटी असताना नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते आणि मग तिची मानसिक व भावनिक अवस्था काय होते? ती व्यसनातून मुक्त होते का? हे या लघुपटामध्ये दाखविण्यात आले आहे. 

अश्विनीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला सुख आणि दुःखाच्या विविध छटा आहेत आणि गिरीजाने ही व्यक्तिरेखा उत्तमरीत्या वठविली आहे. भूमिकेतील बारकावे छान टिपण्यात ती यशस्वी झाली आहे. तिचा हा पहिलाच लघुपट आहे. नॅविअन्स स्टुडिओ प्रा. लि. या बॅनरअंतर्गत नम्रता बांदिवडेकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.

नवज्योतने याआधीही बऱ्याच जाहिरातींसाठी काम केले आहे. तसेच गिरीजासारख्या सरस अभिनेत्रीला घेऊन हा लघुपट बनवण्यात आला आहे.  हा लघुपट म्हणजे गिरीजासाठी नवा अनुभव आहे. अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा हा लघुपट प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडतो हे पाहुयात…

 

girija oak godbole starrer short film quarter now released on youtube

'कोविड-19'च्या संशोधनासाठी वापरणार 'सीएसआर' फंड; 'बीरेक'चा निर्णय!

पुणे : कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी औषधासंबंधीच्या संशोधनाची गती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक तरतुदी बरोबरच संशोधक आणि उत्पादक यांमधील परस्पर सहकार्यही वाढवावे लागणार आहे.

देशाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या ‘बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्रीज रिसर्च असिस्टंट कौन्सिल’च्या (बीरेक) वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) संशोधनासाठी वापर करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच, संशोधन प्रस्तावही मागविण्यात आले आहे. 

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोविड-19’साठी औषध शोधन्यापासून इतर वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीपर्यंत मूलभूत संशोधनाची आवश्‍यकता आहे. त्यात विदेशातून साहित्य आयात करणे शक्‍य नसल्यामुळे स्वदेशी संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्याची गती वाढविणे अनिवार्य झाले आहे. वेळेची मागणी लक्षात घेत कौंसीलच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संदर्भातल्या महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रश्‍नांची उत्तरे वेळेत शोधणे आता आवश्‍यक झाले आहे. 

– ‘धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही’; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

संशोधनाचे प्रस्ताव 

देशभरातून कोविड संदर्भातील संशोधनाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. त्यांची वैज्ञानिक सत्यता आणि उपयुक्तता बघून पुढील कार्यवाही साठी निवड करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी अंतिम मुदत 15 मे पर्यंत आहे. आतापर्यंत 463 प्रस्ताव विभागाकडे दाखल झाले आहेत. पुढील प्रकारातील संशोधनाचे प्रस्ताव कौंसीलकडे पाठविण्यात यावे.

– रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या…

1) निदान : कोविड -19 च्या संसर्गाचे जलद गतीने निदान करणारे तंत्रज्ञान, एखादा भाग, संपूर्ण संच यांचे संशोधन. तसेच, निदानाच्या पद्धतीतील संशोधन 

2) लसीकरण : कोरोनावरील औषध किंवा प्रतिजैविक विकसित करणारे मूलभूत संशोधन, त्याची पद्धत, उत्पादनाचे तंत्रज्ञान आदीसंबंधीचे प्रस्ताव. 

4) उपचार पद्धती : कोरोनाच्या उपचारासाठी योग्य आणि प्रभावी पद्धत, त्यासंबंधीच्या सूचना आणि निरीक्षणे. तसेच, प्राण्यांवर किंवा जीवाणूंवर करावयाच्या संशोधनाचे प्रस्ताव 

5) उपचारासाठीची औषधे : उपलब्ध औषधांचा कोरोनाच्या उपचारासाठी प्रभावी असल्यास त्यासंबंधीचे संशोधनाचे प्रस्ताव. या प्रस्तावानी कोविड-19 संदर्भातील आदर्श नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

– भाडेकरूंना मोठा दिलासा, पुढील तीन महिने भाडं पुढे ढकलण्याच्या घरमालकांना सूचना