kinwat today news

देशात जवळपास २००० जणांची ‘करोना’वर मात

देशात करोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आजचा चौथा दिवस आहे. आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येविषयी माहिती देताना या आकड्यानं १४ हजारांचा टप्पा ओलांडल्याची माहिती दिलीय. परंतु, सोबतच दिलासादायक म्हणजे जवळपास २००० जण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.

…म्हणून वडिलांनाच कराव लागले दोन वर्षीय मुलाचे मुंडण

नागपूर : कोरोना… लहान मुलालाही विचारले तरी तो सांगेल काय आहे कोरोना… मागील काही महिन्यांपासून याचीच चर्चा सुरू आहे… आजवर अनेकांना या विषाणुमुळे जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांचे तर घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वकाही अस्ताव्यस्त झाले आहेत. जीवनावश्‍यक दुकाने सोडली तर सर्वकाही बंद आहेत. यात सलूनचाही (केश कर्तनालय) समावेश आहे. सलून बंद असल्याने चक्‍क वडिलांनाच आपल्या दोन वर्षीय चिमुकल्याचे मुंडण करण्याची वेळ आली… चला तर आपण मुंडण करण्यापूर्वीचा घटनाक्रम जाणून घेऊया… 

शहर नागपूर… येथील सर्वात महत्त्वाचा रोड वर्धा रोड… मोठ-मोठे हॉल, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन, बर्डी आदी ठिकाणी जाण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग… येथील एक पॉश वस्ती… येथील नागरिक कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनचे काटेकोर पालन करीत असल्याचे दिसून येत आहेत. दिवसाच काय रात्रीही नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. 

हेही वाचा – थकल्याने रस्त्यालगत झोपला अन्‌ जीव गमावून बसला

अत्यावश्‍यक सेवेसाठी नागरिक घराबाहेर निघत असले तरी अन्य कामांसाठी नागरिकांची अडचण होत आहे. यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे सलूनचे दुकान… लॉकडाउनमुळे कटिंगचे सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांना दाढी करता येते ते घरी दाढी करून काम चालवत आहेत. मात्र, ज्यांना जमत नाही, त्यांची चांगलीच अडचण होत आहे. अशाच एका अडचणीचा सामना दोन वर्षीय चिमुकल्याच्या वडिलांना करावा लागला. 

या चिमुकल्याचे डोक्‍याचे केस तसे कमीच… यामुळे कुटुंबीय वेळोवेळी त्याची चाटी करू लागले. लवकरात लवकर मुलाला केस यावे यासाठी त्यांचा आटापीटा सुरू होता. आजवर दहा ते बारा वेळा मुंडण केल्यानंतर चिमुकल्याला चांगले केस येण्यास सुरुवात झाली. म्हणून आणखी एक ते दोन वेळा मुंडण करण्याच्या निर्णय कुटुंबीयांनी घेतला. कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्‍य नसल्याने याचा सद्‌उपयोग करण्यासाठी त्यांनी मुंडण करण्याची घाई केली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. परिसरातील सलून चालकांना विनवी केल्यानंतरही कोणीही होकार दिला नाही. त्यामुळे विडलांनीच मुलाचे मुंडण करण्याचा निर्णय घेतला. 

काकाच्या लग्नामुळे हुकला चान्स

चिमुकल्याच्या काकाचे लग्न असल्यामुळे कुटुंबीयांनी मुंडण न करता फकता साईडचे (गोलाई) केस कापण्याचा निर्णय घेतला. कारण, डोक्‍यावर केस तसे कमीच… यानुसार चिमुकल्याचे साईडचेच केस कापले. मात्र, कोरोनामुळे पाहिजे तसे लग्न होऊ शकले नाही. मोजक्‍या पाच ते दहा लोकांत लग्न उरकवा लागले. यानंतर मुलाचे मुंडण केले असते तर बरं झालं असतं, असा विचार कुटुंबीयांच्या मनात आला.

जाणून घ्या – जुना वाद उफाळून आला अन् ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खात्मा झाला

सलून चालकाने होकर दिला; मात्र आलाच नाही

चिमुकल्याचे मुंडण करण्यासाठी वडिलांनी ओळखीच्या सूलन चालकाना फोन करून घरी येण्याची विनंती केली. त्याने लॉकडाउन असताना होकारही दिला. मात्र, आलाच नाही. यानंतर वडिलांनी परत फोन करून येण्यास सांगितले. त्यावन सलून चालकाने उद्या येतो असे सांगितले. यानंतरही तो आला नाही. असे दोन ते तीन दिवस चालले. परंतु, तो काही आलाच नाही. यामुळे मात्र वडील पार निराश झाले. 

दुसऱ्याने स्पष्ट शब्दात दिला नकार

हताश झालेल्या वडिलांनी परिसरातील सलून चालकाच्या घरी जाऊन चिमुकल्याचे मुंडण करून देण्याची विनंती केली. मात्र, त्या सलून चालकाने “काही दिवस थांबनू जा…’ असे म्हणत नकार दिला. वडिलांनी लहान मुलगाच तर आहे काय होते? असे म्हणत मुंडण करण्याची विनंती केली. तरीही त्यांनी नकार दर्शवला. 

तुझा मुलगा खूप रडतो

दोघांनी नकार दिल्याने वडिलांनी घराशेजारी राहणाऱ्या सलून चालकाला मुंडण करून देण्याची विनंती केली. “मुंडण करून द्यायला काही नाही, पण तुझा मुलगा रडतोच खूप’ असे म्हणत एकप्रकारे नकार दर्शवला. आपला मुलगा खरच खूप रडतो याची जाण असल्याने वडिलांनी काही आग्रह केला नाही आणि घरी निघून गेले.

सविस्तर वाचा – बदनाम वस्तीतल्या रात्रीही आता अंधारलेल्या; पाण्याच्या घोटांवर सरताहेत त्यांचे  दिवस

चर्चेअंती घेतला हा निर्णय…

वडिलांनी ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. ओळखीच्या सर्वांना विचारणा केली आणि सर्वांनी मुंडण करण्यास नकार दिल्याचे लक्षात आणून दिले. आपल्याला बाहेर तर जायचे नाही. घरीच राहाचे आहे तर मुलाचे मुंडण करून टाकू असा विचार होता, असे एकमेकांना सांगू लागले. लॉकडाउन संपेपर्यंत मुलाला थोडे केस येऊन जाईल असे त्यांना वाटत होते. चर्चेअंती वडील आणि आजोबांनी स्वत: चिमुकल्याचे मुंडण करण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्यानेही शांतपणे मुंडण करू दिल्याने शेवटी प्रयत्नाला यश आले. 

वस्तराचा केला उपयोग

घरीच मुंडण करायचे असे ठरवल्यानंतर प्रश्‍न होता कसे करायचे. केस कापण्यासाठी लागणारे साहित्या तर घरी नव्हते. मग आजोबांनी दाढी करण्याच्या वस्तराने केस कापू असा विचार मांडला. त्यानुसार हळुहळू चिमुकल्याचे मुंडण करण्यात आले. चिमुकलाही शांतपणे पाणी खेळत मुंडण करू देत असल्याचे पाहून घरच्या मंडळींना हसू येत होते. 

कोरोनाच्या काळात "चेक फ्रॉम होम'! 

मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर घरातच क्वारंटाईनमध्ये असलेल्या ठाण्यातील एका डॉक्‍टरने आता “वर्क फ्रॉम होम’ धर्तीवर “चेक फ्रॉम होम’ सुरू केले आहे. क्वारंटाईनच्या पाचव्या दिवशी डॉक्‍टर समीर देशपांडे आणि जय शहा यांनी इओन केअर (Aeon Care) या पोर्टलद्वारे एका क्‍लिकवर वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाण्यातील इन्फिनिटी मेडिसर्ज सेंटर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्‍टर समीर देशपांडे सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. रुग्णालयात आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे रुग्णालय सील केल्यावर त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून स्वतःहून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे थैमान सुरू असताना रुग्णसेवेचे कर्तव्य बजावणे अत्यावश्‍यक असल्याची जाणीव त्यांना होती. त्यातूनच क्वारंटाईनच्या तिसऱ्या दिवशी त्यांना व्हर्च्युअल वैद्यकीय सेवेची संकल्पना सुचली आणि वेबपोर्टल विषयातील तज्ज्ञ जय शहा यांच्या मदतीने ती पाचव्या दिवशी प्रत्यक्षातही आली. 

डॉ. देशपांडे यांनी सुरू केलेल्या https://aeon.care या वैद्यकीय संकेतस्थळावर केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारांबाबतही माहिती मिळू शकते. नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला देणाऱ्या अनेक नामवंत डॉक्‍टरांची यादी येथे आहे. लॉकडाउनमुळे बहुतेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा व्यक्तींना आजारांबाबत माहिती आणि उपचारांचा सल्ला मिळणे आवश्‍यक आहे. याच हेतूने इओन केअर सुरू केले, असे त्यांनी सांगितले. आज घराबाहेर न पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सेवा मिळायला. अशी सेवा “ना नफा’ तत्त्वावर सुरू करण्याची गरज ध्यानात घेऊन संशोधन सुरू केले. माझे सहकारी जय शहा यांच्या मदतीने हे ऑनलाईन पोर्टल अस्तित्वात आले, असे ते म्हणाले. 

घरातच राहा 
नागरिकांचा प्रतिसाद पाहिल्यावर व्हर्च्युअल वैद्यकीय सल्ला केंद्राची किती आवश्‍यकता आहे ते कळले, असे डॉ. देशपांडे सांगतात. क्वारंटाईन सुरू झाल्यावर त्यांना सोसायटीत थोडी अडचण आली होती, मात्र आता सर्व सुरळीत झाले आहे. क्वारंटाईनचा दहावा दिवसही आता संपला. हा कालावधी संपल्यावर पुन्हा प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा सुरू करणार, असे ते म्हणतात. कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

क्रूर नियती! पत्नीच्या आक्रोशाने अख्ख गाव गहिवरलं

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) –  परदेशात राहणाऱ्या मुला-मुलींना गावात राहणाऱ्या आई-वडिलांना वेळ देता येत नाही. इतकंच काय तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी यायलाही मुलांकडे वेळ नसतो. त्यामुळे शेजारी-पाजारी अंत्यसंस्कार उरकून घेतात. अशावेळी परदेशात राहणाऱ्या मुला-मुलींचा अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्याचा हट्ट असतो; खरं तर ती गोष्ट पैशापुढे नाती कफल्लक असल्याचे द्योतक असते. अलीकडे असे प्रकार खूप ठिकाणी घडतात. त्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था संपुष्टात येते, की काय? अशी भीती उभी राहते. अशीच व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेण्याची घटना गुरुवारी तालुक्‍यातील मोर्लेत घडली असली तरी तिला अपरिहार्यतेची, कारुण्याची किनार आहे. 

संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी, डोळ्यात टचकन पाणी आणणारी ती घटना. मोर्ले मूळ गाव असलेले चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर (वय 67) पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे यांच्यासोबत अंधेरी पूर्व येथील तेली गल्लीत राहायचे. अधूनमधून ते पत्नीसह गावी यायचे. शिमगोत्सवापूर्वी ते पत्नीसह गावी आले होते. पुन्हा रामनवमीला यायचे असल्याने त्यांनी पत्नीला गावी ठेवले होते; पण तत्पूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते रामनवमीला येऊन पत्नीला मुंबईला घेऊन जाऊ शकले नाहीत. गावात बीएसएनएलचा टॉवर अलीकडे सुरू झाल्याने त्यांचा संवाद मात्र मोबाईलद्वारे सुरू असायचा. 

दरम्यान, काल (ता. 16) दुपारी चंद्रकांत बांदेकर यांचे मुंबईत निधन झाले. गावकऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. पती मुंबईत आणि पत्नी मोर्लेत, अशी अवस्था. पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीला मुंबईत न्यायचे अथवा पतीचा मृतदेह गावी आणायचा तर लॉकडाउनमुळे अशक्‍यच. प्रसंग बाका होता. पतीच्या निधनाची कुणकूण लागताच पत्नीने हंबरडाच फोडला. ज्याच्यासोबत अख्ख आयुष्य घालवले, त्याचे अखेरचे दर्शनही घेता येऊ नये यासारखे मोठे दुःख जगात दुसरे नसेल. त्यातही तर पती-पत्नी. त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता.

पतीच्या अंत्यदर्शनासाठी पत्नीचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. सरपंच महादेव गवस, उपसरपंच पंकज गवस, पोलिसपाटील तुकाराम चिरमुरे, रमेश गवस, संतोष मोर्ये आदींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतही त्यांचा सतत संपर्क सुरू होता. अखेरीस मुंबईहून त्यांच्या सुनेने प्रसंगावधान दाखवून गावातील ग्रामस्थांच्या स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉल केला. पतीचे पार्थिव बघताच त्यांनी टाहो फोडला. त्याने उपस्थितांनाही गलबलून आले. 

हे पण वाचा – गावाची तहाण भागविण्यासाठी पोटच्या गोळ्याचे पार्थिव ठेवले बाजूला

चंद्रकांत बांदेकर हरहुन्नरी आणि हसतमुख होते. सर्व वयोगटांतील माणसांशी त्यांची मैत्री असायची. ते नाटकात उत्तम भूमिका करायचे, तसेच ते चांगले दिग्दर्शकही होते. मुंबईस्थित मोर्लेवासीयांच्या ग्रामोद्धार मंडळाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. अशा व्यक्तीच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली. 

हे पण वाचा –  कथा त्या भावंडांची! तब्बल २७ दिवसांनी थांबला तो माणुसकी गोठवणारा प्रवास                                      

अखेरची भेट हुकली 
सर्वांत मोठे दुःख होते ते पत्नीचे. त्यांना पतीचे अखेरचे दर्शनही लॉकडाउनमुळे प्रत्यक्ष घेता आले नाही. सुखदुःखात एकमेकाला साथ दिली; पण अंतसमयी जवळ राहता आले नाही, अखेरचा निरोपही जोडीदाराला देता आला नाही, त्यामुळे त्यांना झालेले दुःख, त्यांनी भोगलेली वेदना याची कल्पना कुणीही करू शकत नाही. लॉकडाउनमुळे दोन जीवांची अखेरची भेटही होऊ शकली नाही, ते सगळे वास्तव काळीज पोखरणारे आहे. 

शाब्बास ! अखेर रेशनचा काळाबाजार उघडकीस

सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळण्याबाबत असलेल्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही भरारी पथके तक्रारी प्राप्त झालेल्या दुकाने, संवेदनशील दुकाने यांना भेटी देवून तपासणी करीत आहेत. तसेच तक्रारींचे निराकरण करीत आहेत. गेल्या पाच दिवसात 190 स्वस्त धान्य दुकान तपासणी करण्यात आली असून, 17 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जादा दराने धान्य विकणे व विहीत परिमाणापेक्षा कमी धान्य देणे या कारणास्तव तीन स्वस्त धान्य दुकाने रद्द करणेत आली असून एक दुकान निलंबित करणेत आले आहे तसेच दाेन तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

सातारा जिल्हयामध्ये एकूण 11 तालुक्यामध्ये 1681 स्वस्त धान्य दुकाने आहेत चालू महिन्याचे म्हणजे एप्रिल 2020 मध्ये 5460 मे.टन गहू व 3398 मे.टन.तांदूळ नियमित धान्य वाटप झाले असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील प्रती लाभार्थी 5 कि.मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना माहे मे पासून प्रति सदस्य तीन किलाे गहू आठ रुपये प्रमाणे व दाेन किलाे तांदूळ बारा रुपये प्रमाणे वाटप केला जाणार आहे. 
      
23 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु

 जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 23 ठिकाणी शिवभोजन ब केंद्र सुरु केले असून गरीब व गरजू लोकांसाठी 11 ते 3 या वेळेत प्रती माणशी  रु.5/-प्रमाणे थाळी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर 23 केंद्रावर अंदाजे 1800 गरीब व गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत. 

पात्र रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यास अडचणी आल्यास तक्रार निवारण करणेसाठी अत्यावश्यक सेवा मदत क्र.1077 (हेल्पलाईन) वेळ सकाळी 9.00 ते रात्री 9.00 उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयातील दूरध्वनी .02162-234840 यावरही तक्रारी नोंदविता येतील. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना धान्य वाटपात गैरप्रकार करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांचेवर जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गंभीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली.

इराणमध्ये अडकलेले `ते` चौघे परतले

बांदा (सिंधुदुर्ग) – इराणमध्ये अडकलेले “ते’ चार युवक अखेर काल (ता. 16) सायंकाळी उशिरा आपापल्या घरी दाखल झाले. तब्बल 26 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी फोंडा (गोवा) येथे त्यांनी पूर्ण केला. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सर्व कागदोपत्री परवानग्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची विलगीकरण कक्षातून मुक्तता करण्यात आली. पत्रादेवी-बांदा तपासणी नाक्‍यावर त्यांचे गावाच्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

गोव्यातील जीकेबी या चष्माच्या कंपनीकडून दोन वर्षाच्या मुदतीसाठी इराण येथील कारखान्यात सिंधुदुर्गातील सात व कोल्हापूर येथील एका युवकाला पाठविण्यात आले होते. 14 मार्चला त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपला होता. त्यांनी भारतात परतीची तिकिटेही काढली होती; मात्र त्याच दरम्यान भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व युवक इराणमध्येच अडकले. 
याबाबत “सकाळ’ने सर्वप्रथम आवाज उठवित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आमदार नीतेश राणे यांनी युवकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी इराण सरकारकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे समजताच आमदार राणे यांनी इराणमधील भारत दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्व युवकांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. 

25 दिवसांपूर्वी त्यांना खास विमानाने भारतात आणून फोंडा (गोवा) येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी त्यांना जिल्ह्यात पत्रादेवी बॉर्डरवर आणण्यात आले होते. मात्र आवश्‍यक परवानग्या पूर्ण न झाल्याने त्यांना परत गोव्यात नेण्यात आले होते. याची माहिती संबंधित युवकांनी आमदार राणे यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याशी राणे यांनी चर्चा करून युवकांना परत आणण्यासाठी आवश्‍यक परवानग्या पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. 

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्व युवकांना पत्रादेवी-बांदा सीमेवर आणण्यात आले. यात सागर पंडित (सातोसे), उदय पाटकर (वेत्ये), विकास सुतार (भेडशी) व नितीन गावडे (चंदगड) यांचा समावेश आहे. उर्वरित गोव्यातील चार जणांना 10 एप्रिलला घरी पाठविण्यात आले. गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. इराणमधून घरी परत येण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत आमदार नीतेश राणे यांचे खूप मोठे योगदान राहिल्याचे युवकांनी सांगितले. 
 

Corona Update : नाशिकच्या 'या' भागातील ४४ जणांना चक्क कोरोनाची लक्षणे

नाशिक : शहरातील ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागांतील घरांची तपासणी पालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सुरू झाली आहे. 75 आरोग्य पथकांतर्फे चार हजार 661 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात 17 हजार 414 नागरिकांची तपासणी करण्यात आली. अंबड येथील संजीवनगर व नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी भागात 44 जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.

संजीवनगर, बजरंगवाडीतील 44 जणांना कोरोनाची लक्षणे

शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गोविंदनगर परिसरात आढळून आला. त्यानंतर नवश्‍या गणपती, नाशिक रोड येथील तरण तलाव परिसर, नाशिक- पुणे महामार्गावरील समाजकल्याण विभागाचे निवारा केंद्र व अंबड येथील संजीवनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेतर्फे पाचशे मीटरचा परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. गोविंदनगरमध्ये 22 वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली. तेथे वैद्यकीय पथकातर्फे एक हजार 495 घरांची तपासणी करण्यात आली. अंबड येथील संजीवनगरमध्ये पंधरा वैद्यकीय पथकांमार्फत एक हजार 245 घरे तपासण्यात आली.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

75 आरोग्य पथकांमार्फत 4,661 घरांना भेटी

नाशिक- पुणे महामार्गावरील बजरंगवाडी परिसरात वैद्यकीय पथकाने 193 घरांची तपासणी केली. नाशिक रोड भागातील तरण तलाव परिसरात 21 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून एक हजार 196 घरांमध्ये तपासणी झाली. संजीवनगर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचा सिडकोतही वावर झाल्याने ज्या भागात संचार झाला, तेथे 22 पथकांच्या माध्यमातून एक हजार 245 घरे तपासण्यात आली. नवश्‍या गणपती परिरसरात बारा वैद्यकीय पथकांकडून 528 घरे तपासण्यात आली. संजीवनगर व बजरंगवाडी परिसरात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत 44 नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळून आले. बजरंगवाडी भागात 32, तर संजीवनगर भागातील बारा नागरिकांचा समावेश आहे. पुढील तपासणीसाठी त्यांना महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात आले.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो “तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले ‘एसीपी’ आम्ही आहोत”!

57 अहवाल प्रलंबित

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून 30 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात 385 संशयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील 323 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 57 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी, बिस्मिल्ला कॉलनीतील वृद्धेचा मृत्यू, रुग्णसंख्याही वाढली

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय-घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 65 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा शनिवारी (ता. १८) सकाळी पावणे सात वाजता मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. शहरातील हा कोरोनाचा तिसरा बळी आहे. तर आणखी एक १५ वर्षीय मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. 

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या या वृद्धेवर अगोदर जसवंतपुरा-किराडपुरा मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून त्यांनी आणखी एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात येऊन संबंधित रुग्णालयही सील करण्यात आले होते. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम – वाचा

घाटी रुग्णालयाच्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात उपचार सुरू असताना त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. 16 एप्रिलला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना स्पेशल कोरोना वार्डात हलवण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले होते.

शहरातील कोरोनाचा हा तिसरा मृत्यू आहे. हे तीनही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. आता आणखी एक रुग्ण कोरोना झिटिव्ह आल्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २९ झाली आहे.  

आज आणखी एक पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २९वर

दरम्यान, बायजीपुयातील १५ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुयातील १७ वर्षीय मुलाला लागण झाल्याचे समोर आले होते.

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

तो १० एप्रिलला गरोदर आईला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून औरंगाबादला आला होता. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यात आईचा आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला. आता त्याच कुटुंबात १५ वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यामुळे यंत्रणेची झोप उडाली आहे. 
 

सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर बेळगावात पोलीस उपनिरीक्षकांवर काळाचा घाला…..

बेळगाव :खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. गणाचारी वाहन अपघातात जागीच ठार झाले. शनिवार (ता.18) येळ्ळूर रोडवरील केएलइ नजीक सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडला असून अपघाची नोंद वाहतूक दक्षिण पोलीस ठाण्यात झाली आहे. 

हेही वाचा- इराणमध्ये अडकलेले `ते` चौघे परतले

गणाचारी हे येळ्ळूर येथे  वास्तव्यास असून ते खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हे विभागाचे  पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत होते. लॅाकडाऊन असल्याने ते सकाळच्या ड्युटीवर जाण्यासाठी सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडले होते. येळ्ळूर रोडवरील केएलनजीक येताच अज्ञात वाहनांने त्यांच्या दुचाकीला ठोकरून पलायन केल्याने ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ते 31 मे ला सेवानिवृत्त होणार होते.

 

 

मरकजनंतर दडून बसलेल्या २४ परदेशी नागरिकांना अटक

नगर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेवासे, जामखेड व शहरातील मुकुंदनगर येथे प्रार्थनास्थळांमध्ये दडून बसलेल्या 24 विदेशींसह पाच भारतीय नागरिकांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याविरुद्ध जामखेड, भिंगार आणि नेवासे येथील पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व जण नवी दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे सांगण्यात आले होते. 

याबाबत माहिती अशी ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी सुरू असताना काही दिवसांपूर्वी नेवासे, जामखेड आणि नगर शहरातील मुकुंदनगर येथील प्रार्थनास्थळांमध्ये लपून बसलेल्या 29 जणांना पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. या सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही दिवस त्यांना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

त्यांचा देखरेखीखालील विशिष्ट कालावधी संपल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आज अटक केली. त्यांना उद्या (शनिवारी) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.