
किनवट(आनंद भालेराव)
किनवट तालुका इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाच्या तालुका कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक सल्लागार माजी नगराध्यक्ष ईसाखान सरदारखान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यात आज पर्यंतच्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन किनवट तालुक्यातील समस्या विषयक सांगोपांग चर्चा करण्यात आली .
याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष ईसाखान म्हणाले की, किनवट तालुक्यात अनेक समस्या असून यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करावे. यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी किनवट तालुका अध्यक्ष आनंद भालेराव, कार्यकारी अध्यक्ष नसीर तगाले, उपाध्यक्ष शेख आतिफ, सचिव शेख परवीन मॅडम, सहसचिव सुहास मुंडे, सदस्य-पत्रकार राजेश पाटील , वावळे बोधडी, विजय जोशी, प्रणय कोवे, सय्यद नदीम आदी पदाधिकारी उपस्थित होते.