
किनवट (आनंद भालेराव)
किनवट तालुक्यातील सन 2016 ते 2017 सालचा दिव्यांगाचा राखीव निधी 5010141.15 लक्ष रुपये 134 ग्रामपंचायतीने अपहार केल्याप्रकरणी दोषी ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करा व दिव्यांगा चा राखीव निधी तात्काळ खर्च करण्यात यावा. या व इतर मागण्यांसाठी दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय किनवट समोर अमरून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत प्रशासन काय निर्णय घेते? याकडे सर्व किनवटवाशी तसेच महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचे लक्ष लागून आहे.