मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर देवेंद्र जोशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

नांदेड:
नांदेड येथील एक प्रतिष्ठित, मितभाषी, आजातशत्रू व्यक्तीमत्व, एक कुटुंबवस्तल व्यक्ती, सदाचारी मनुष्य, लहान थोरापासून सर्वांचा आवडतं व्यक्तिमत्त्व, डॉ.देवेन्द्र जोशी सर यांचे आज अल्पशा आजाराने दि.24 जानेवारी रोजी दुपारी 2.20 वाजता निधन झाले.

आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी गोवर्धन घाट नांदेड येथे सायंकाळी 5 वाजता त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
सदरील दुःखद बातमी समजताच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दुःखद धक्का बसला.शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मित्रमंडळींनी समाज माध्यमाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पश्चात पत्नी,एककन्या व एक मुलगा असा परिवार आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.