
किनवट (आनंद भालेराव):
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोकुंदा येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तद्नंतर ध्वजारोहण व्यंकट भांडारवार यांच्या हस्ते आले.
किनवट नगरपालिकेच्या मैदानात भव्य मंडप उभारून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
शिवसेना सदस्य अभियानाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी ज्योतिबादादा खराटे, बालाजी मुरकुटे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, उपप्रमुख कपिल अण्णा रेड्डी, वेंकट अण्णा भंडारवार ,मारोती सुंकलवाड,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, सुरज सातूरवार, माजी उपसभापती गजानन कोल्हे, शहर प्रमुख संतोष येलचलवार,बजरंग वाडगुरे, राजेंद्र भातनासे,राज माहुरकर, सुरेश घुमडवार,जयस्वाल,आनंद बामणे,अजय दर्शनवाड आदी पत्रकार केशव डहाके, किरण ठाकरे, आनंद भालेराव, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.