kinwat today news
मरकजनंतर-दडून-बसलेल्या-२४-परदेशी-नागरिकांना-अटक

मरकजनंतर दडून बसलेल्या २४ परदेशी नागरिकांना अटक

नगर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेवासे, जामखेड व शहरातील मुकुंदनगर येथे प्रार्थनास्थळांमध्ये दडून बसलेल्या 24 विदेशींसह पाच भारतीय नागरिकांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याविरुद्ध जामखेड, भिंगार आणि नेवासे येथील पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व जण नवी दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे सांगण्यात आले होते. 

याबाबत माहिती अशी ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी सुरू असताना काही दिवसांपूर्वी नेवासे, जामखेड आणि नगर शहरातील मुकुंदनगर येथील प्रार्थनास्थळांमध्ये लपून बसलेल्या 29 जणांना पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. या सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही दिवस त्यांना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

त्यांचा देखरेखीखालील विशिष्ट कालावधी संपल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आज अटक केली. त्यांना उद्या (शनिवारी) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply