kinwat today news
…म्हणून-वडिलांनाच-कराव-लागले-दोन-वर्षीय-मुलाचे-मुंडण

…म्हणून वडिलांनाच कराव लागले दोन वर्षीय मुलाचे मुंडण

नागपूर : कोरोना… लहान मुलालाही विचारले तरी तो सांगेल काय आहे कोरोना… मागील काही महिन्यांपासून याचीच चर्चा सुरू आहे… आजवर अनेकांना या विषाणुमुळे जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांचे तर घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वकाही अस्ताव्यस्त झाले आहेत. जीवनावश्‍यक दुकाने सोडली तर सर्वकाही बंद आहेत. यात सलूनचाही (केश कर्तनालय) समावेश आहे. सलून बंद असल्याने चक्‍क वडिलांनाच आपल्या दोन वर्षीय चिमुकल्याचे मुंडण करण्याची वेळ आली… चला तर आपण मुंडण करण्यापूर्वीचा घटनाक्रम जाणून घेऊया… 

शहर नागपूर… येथील सर्वात महत्त्वाचा रोड वर्धा रोड… मोठ-मोठे हॉल, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन, बर्डी आदी ठिकाणी जाण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग… येथील एक पॉश वस्ती… येथील नागरिक कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनचे काटेकोर पालन करीत असल्याचे दिसून येत आहेत. दिवसाच काय रात्रीही नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. 

हेही वाचा – थकल्याने रस्त्यालगत झोपला अन्‌ जीव गमावून बसला

अत्यावश्‍यक सेवेसाठी नागरिक घराबाहेर निघत असले तरी अन्य कामांसाठी नागरिकांची अडचण होत आहे. यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे सलूनचे दुकान… लॉकडाउनमुळे कटिंगचे सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांना दाढी करता येते ते घरी दाढी करून काम चालवत आहेत. मात्र, ज्यांना जमत नाही, त्यांची चांगलीच अडचण होत आहे. अशाच एका अडचणीचा सामना दोन वर्षीय चिमुकल्याच्या वडिलांना करावा लागला. 

या चिमुकल्याचे डोक्‍याचे केस तसे कमीच… यामुळे कुटुंबीय वेळोवेळी त्याची चाटी करू लागले. लवकरात लवकर मुलाला केस यावे यासाठी त्यांचा आटापीटा सुरू होता. आजवर दहा ते बारा वेळा मुंडण केल्यानंतर चिमुकल्याला चांगले केस येण्यास सुरुवात झाली. म्हणून आणखी एक ते दोन वेळा मुंडण करण्याच्या निर्णय कुटुंबीयांनी घेतला. कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्‍य नसल्याने याचा सद्‌उपयोग करण्यासाठी त्यांनी मुंडण करण्याची घाई केली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. परिसरातील सलून चालकांना विनवी केल्यानंतरही कोणीही होकार दिला नाही. त्यामुळे विडलांनीच मुलाचे मुंडण करण्याचा निर्णय घेतला. 

काकाच्या लग्नामुळे हुकला चान्स

चिमुकल्याच्या काकाचे लग्न असल्यामुळे कुटुंबीयांनी मुंडण न करता फकता साईडचे (गोलाई) केस कापण्याचा निर्णय घेतला. कारण, डोक्‍यावर केस तसे कमीच… यानुसार चिमुकल्याचे साईडचेच केस कापले. मात्र, कोरोनामुळे पाहिजे तसे लग्न होऊ शकले नाही. मोजक्‍या पाच ते दहा लोकांत लग्न उरकवा लागले. यानंतर मुलाचे मुंडण केले असते तर बरं झालं असतं, असा विचार कुटुंबीयांच्या मनात आला.

जाणून घ्या – जुना वाद उफाळून आला अन् ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खात्मा झाला

सलून चालकाने होकर दिला; मात्र आलाच नाही

चिमुकल्याचे मुंडण करण्यासाठी वडिलांनी ओळखीच्या सूलन चालकाना फोन करून घरी येण्याची विनंती केली. त्याने लॉकडाउन असताना होकारही दिला. मात्र, आलाच नाही. यानंतर वडिलांनी परत फोन करून येण्यास सांगितले. त्यावन सलून चालकाने उद्या येतो असे सांगितले. यानंतरही तो आला नाही. असे दोन ते तीन दिवस चालले. परंतु, तो काही आलाच नाही. यामुळे मात्र वडील पार निराश झाले. 

दुसऱ्याने स्पष्ट शब्दात दिला नकार

हताश झालेल्या वडिलांनी परिसरातील सलून चालकाच्या घरी जाऊन चिमुकल्याचे मुंडण करून देण्याची विनंती केली. मात्र, त्या सलून चालकाने “काही दिवस थांबनू जा…’ असे म्हणत नकार दिला. वडिलांनी लहान मुलगाच तर आहे काय होते? असे म्हणत मुंडण करण्याची विनंती केली. तरीही त्यांनी नकार दर्शवला. 

तुझा मुलगा खूप रडतो

दोघांनी नकार दिल्याने वडिलांनी घराशेजारी राहणाऱ्या सलून चालकाला मुंडण करून देण्याची विनंती केली. “मुंडण करून द्यायला काही नाही, पण तुझा मुलगा रडतोच खूप’ असे म्हणत एकप्रकारे नकार दर्शवला. आपला मुलगा खरच खूप रडतो याची जाण असल्याने वडिलांनी काही आग्रह केला नाही आणि घरी निघून गेले.

सविस्तर वाचा – बदनाम वस्तीतल्या रात्रीही आता अंधारलेल्या; पाण्याच्या घोटांवर सरताहेत त्यांचे  दिवस

चर्चेअंती घेतला हा निर्णय…

वडिलांनी ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. ओळखीच्या सर्वांना विचारणा केली आणि सर्वांनी मुंडण करण्यास नकार दिल्याचे लक्षात आणून दिले. आपल्याला बाहेर तर जायचे नाही. घरीच राहाचे आहे तर मुलाचे मुंडण करून टाकू असा विचार होता, असे एकमेकांना सांगू लागले. लॉकडाउन संपेपर्यंत मुलाला थोडे केस येऊन जाईल असे त्यांना वाटत होते. चर्चेअंती वडील आणि आजोबांनी स्वत: चिमुकल्याचे मुंडण करण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्यानेही शांतपणे मुंडण करू दिल्याने शेवटी प्रयत्नाला यश आले. 

वस्तराचा केला उपयोग

घरीच मुंडण करायचे असे ठरवल्यानंतर प्रश्‍न होता कसे करायचे. केस कापण्यासाठी लागणारे साहित्या तर घरी नव्हते. मग आजोबांनी दाढी करण्याच्या वस्तराने केस कापू असा विचार मांडला. त्यानुसार हळुहळू चिमुकल्याचे मुंडण करण्यात आले. चिमुकलाही शांतपणे पाणी खेळत मुंडण करू देत असल्याचे पाहून घरच्या मंडळींना हसू येत होते. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply