kinwat today news

कोरोना : नांदेड जिल्ह्यात नियंत्रणात 182 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण

नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 570 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 182 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 56 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 40 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 530 अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी 26 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 322 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 290 नमुने निगेटीव्ह आले असून 27 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 75 हजार 64 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply