kinwat today news
corona-:-लॉकडाउनमध्ये-ओघ-थांबेना;-आठ-हजार-जणांचा-प्रवास 

Corona : लॉकडाउनमध्ये ओघ थांबेना; आठ हजार जणांचा प्रवास 

औरंगाबाद : लॉकडाउन, जिल्हाबंदी, संचारबंदी अशी शासनाची बंधने असतानाही शहरात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या चोवीस तासांत शहरात आठ हजार ५९३ जणांचा प्रवेश झाला आहे. एकट्या नगर नाक्यावर सात हजार ९१५ जणांची स्क्रीनिंग करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ते नागरिक जिथे अडकून पडले असतील त्यांनी त्याच शहरात थांबावे, शासन त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करेल, असे वारंवार जाहीर करण्यात आले आहे; मात्र रोज हजारो जण खोटी कारणे देऊन प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. लॉकडाउनच्या गेल्या काही दिवसांत औरंगाबाद शहरातून सुमारे पावणेदोन लाख नागरिकांनी प्रवास केल्याचे समोर आले होते. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्याचा नव्हे, तर वाढण्याची भीती आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी  क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी – क्लिक करा

यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्तही प्रसिद्ध केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश काढले आहेत. तर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दुपारी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही शहरातून प्रवास करणाऱ्यांचा ओघ कमी झालेला नाही. गुरुवारी (ता. १७) दुपारी दोन ते शुक्रवारी दुपारी दोन या चोवीस तासांत आठ हजार ५९३ प्रवाशांची महापालिकेतर्फे स्क्रीनिंग करण्यात आल्याची आकडेवारी सांगते. 

कुठे किती प्रवासी? 
महापालिकेने मुंबई, पुणे, नाशिकमार्गे येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यासाठी नगर नाका छावणी येथे सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी सात हजार ९१५ तर केंब्रिज नाका येथे १४३, हर्सूल नाका येथे ५३५ जणांची तपासणी करण्यात आली. म्हणजेच हे प्रवासी शहरातून बाहेर गेलेले नाहीत, हे स्पष्ट होते. लॉकडाउनच्या काळात एक लाख ८१ हजार ५७ प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply