kinwat today news
एसटीच्या-वाहतुकीत-सोमवारपासून-वाढ;राज्य-सरकारचा-महामंडळाला-आदेश 

एसटीच्या वाहतुकीत सोमवारपासून वाढ;राज्य सरकारचा महामंडळाला आदेश 

मुंबई – लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी मंत्रालयासह राज्य सरकारी कार्यालयांत 30 टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने अत्यावश्‍यक सेवेतील वाहतूक वाढवण्याचा आदेश एसटी महामंडळाला दिला. त्यानंतर मुंबई विभाग नियंत्रकांनी मुंबई, परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल, उरण आगार व्यवस्थापकांना परिपत्रक पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई व उपनगरांतील अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामावर पोहोचवण्यासाठी एसटीची बससेवा सुरू आहे. तथापि, सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती रोडावल्याने अत्यावश्‍यक सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये 30 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला बसगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या संदर्भात एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक, चालन उपमहाव्यवस्थापक यांनी 16 एप्रिलला मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये 20 एप्रिलपासून आणखी काही मार्गांवर एसटी बसच्या अधिक फेऱ्या चालवण्याचा निर्णय झाला. त्याच्या नियोजनासाठी शनिवारी (ता. 18) कुर्ला नेहरूनगर येथे आगारप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीला परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल, उरण या आगारांतील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, वाहतूक पर्यवेक्षक, लिपिक यांची उपस्थिती अनिवार्य असेल. कामावर गैरहजर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही एसटी महामंडळाने दिले आहेत. दरम्यान, एसटीच्या वाहतूक सेवेत वाढ होणार नसल्याचे महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी सांगितले. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply