kinwat today news
सोनईत-रोज-बाराशे-जणांची-पंगत,-यश-ग्रुपचा-उपक्रम

सोनईत रोज बाराशे जणांची पंगत, यश ग्रुपचा उपक्रम

सोनई: यश मित्रमंडळाच्या वतीने आजपासून २६ एप्रिलपर्यंत रोज सायंकाळी सोनईतील वयोवृद्ध, विधवा महिला, गरजू व हातावर पोट असलेल्या बाराशे व्यक्तींना जेवणाचे पाकीट देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

यश मित्र मंडळातील राजेंद्र गुगळे, मयूर बनकर, डाॅ. संपत खोसे, जयराम काळे, सुभाष शिरसाठ, देवदत्त पालवे, संजय फुंदे, नितीन शेटे व मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून रोज बाराशे जेवणाचे पाकीट देण्याचा निर्णय घेवून आज तीन पोळ्या, बटाटा भाजी व मसाला भाताचा डबा देण्यात आला. स्वयंपाक कक्षाला सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी भेट देवून आवश्यक सूचना केली. 

गावातील बालाजीनगर, अंबिकानगर, लक्ष्मीनगर, दत्तनगर, रामझिरा, खरवंडी रस्ता व खाण परीसरात डब्यांचे वितरण करण्यात आले. डबे तयार करण्यासाठी गावातील तरुण मंडळ, ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी परीश्रम घेतले. या उपक्रमाचे परीसरातून स्वागत होत आहे. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या गरजूंना घासातला घास देण्यातून मिळणारे समाधान सर्वश्रेष्ठ आहे. या शिकवणीतून हा उपक्रम हाती घेतला आहे. गरज पडल्यास हे अन्नदान अधिक दिवस वाढविण्यात येईल.
– राजेंद्र गुगळे, सदस्य यश मित्रमंडळ

सामाजिक भान ठेवत यश मंडळाने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे.अन्न शिजविणे,पार्सल करणे व वितरणकरीता घेत असलेली काळजी महत्वपूर्ण आहे.
– सुनिल गडाख,सभापती अर्थ व पशुसंवर्धन

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply