kinwat today news
अखंड-हरिनाम-सप्ताह-रद्द-करून-सीएम-सहायता-निधीस-दिले-एक-लाख

अखंड हरिनाम सप्ताह रद्द करून सीएम सहायता निधीस दिले एक लाख

महालगाव (जि. औरंगाबाद) ः चोरवाघलगावच्या (ता. वैजापूर) ग्रामस्थांनी कोरोनामुळे यंदाचा अखंड हरिनाम सप्ताह रद्द केला आहे. शिवाय गोरगरिबांना धान्यवाटप करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक लाख, एक हजार रुपये देण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे. 

चोरवाघलगावच्या अखंड हरिनाम सप्ताहास मोठी परंपरा आहे. ग्रामस्थ यात मनोभावे सहभागी होतात. नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी असलेले येथील मूळ रहिवासी हरिनाम सप्ताहानिमित्त गावी येतात. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेतला. गोरगरिबांना धान्यवाटपही करण्यात आले. शिवाय मुख्यमंत्री निधीस एक लाख, एक हजार रुपये देण्यात आले. सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग पाळत तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, गटविकास अधिकारी अजय पवार, वैजापूरचे तलाठी जितेंद्र चापानेरकर, ग्रामसेवक कचरे, तलाठी दिलवाले, मधुकर महाराज, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील आदी उपस्थित होते. 
 

प्रेरणावाट : स्वतः कोरोनाग्रस्त, तरीही जपला डॉक्टरी धर्म

वाळूज परिसरात चोरडिया परिवाराच्या वतीने उपक्रम 
वाळूज, ता.१० (बातमीदार) ः कोरोनामुळे बजाजनगर व परिसरात आठ ते नऊ दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने येथील मजुरांवर तसेच गरीब कष्टकरी महिला, विधवा यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत व्हावी, यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनिल चोरडिया व जिल्हा परिषद सदस्या ज्योती चोरडिया यांच्या वतीने महावीर जयंतीपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत दररोज दोन हजार गरजवंतांना भोजनाचे वाटप होत आहे. 

यासाठी शांतीलाल चोरडिया, विमल चोरडिया, पंढरपूरचे माजी उपसरपंच संतोष चोरडिया, माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा चोरडिया, अभय चोरडिया, सरला चोरडिया, मयूर चोरडिया, ग्रामपंचायत सदस्य अमित कुमार चोरडिया, सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित चोरडिया, सागर चोरडिया, रिंकू चोरडिया, पल्लवी चोरडिया, वैशाली चोरडिया, पायल चोरडिया, दीक्षा चोरडिया, भूमी चोरडिया, भूषण चोरडिया, अक्षय चोरडिया, यश चोरडिया, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, आशिष पावडे, रवी म्हस्के, यमराज गिरे, गणेश कोलते, करवीर कुटोळी, कचरू जाधव, गोविंद जवने, राजेश सिंग, सुनीता आहिरे, सुरेखा शिंदे, नंदा राजपूत, मनीषा देशमुख, प्रीती शिंदे, नील चोरडिया व लौकिक चोरडिया परिश्रम घेत आहेत. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply