kinwat today news
कथा-त्या-भावंडांची!-तब्बल-२७-दिवसांनी-थांबला-'तो'-माणुसकी-गोठवणारा-प्रवास 

कथा त्या भावंडांची! तब्बल २७ दिवसांनी थांबला 'तो' माणुसकी गोठवणारा प्रवास 

गुहागर – सती गावातून मध्यरात्री तीन भावंडे पोलिस ठाण्यात आली. लोकांच्या तावडीपेक्षा पोलिस ठाणे बरे एवढाच विचार त्याक्षणी त्यांच्या मनात होता. आल्या प्रसंगाला तोंड द्यावेच लागणार होते. आता पुढे काय वाढून ठेवलंय असे वाटत असतानाच चिपळूण पोलिसांकडून या भावंडांना सुखद वागणूक मिळाली. बहिणीला डॉक्टरांकडे नेण्याचा मार्ग सुकर झाला.
 
सकाळी 8 वाजल्यापासून आसर्‍याच्या शोधात सुरू झालेली भटकंती कोठे नेऊन पोचविणार हा प्रश्न होताच. पळून जाणार नाही हा विश्वास पोलिसांना देण्यात ते यशस्वी झाले होते. पोलीस ठाण्यातील अनुभव अत्यंत चांगला होता. कोणीही हिडीसफीडीस केले नाही. सहानुभूतीची वागणूक दिली. भावंडांनी त्यांना 25 दिवसांतील सारी हकिगत सांगितली. सध्याचे संवेदनशील वातावरण आणि पोलिसांवर ताण असतानाही चिपळूणात मध्यरात्री पोलिसांच्या सहृदयतेचा अनुभव त्यांना आला. भावंडांनी ते क्वारंटाईन होण्यास तयार आहेत असेही पोलिसांना सांगितले. पण मुलांना क्‍वारंटाईन करण्याची गरज नाही हे पोलिसांनाही माहिती होते. अखेर पोलिसांनी त्यांची हतबलता लक्षात घेऊन तुम्ही परत जा असे फर्मावले.

या भावंडांच्या कथेचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढिल लिंकवर क्लिक करा – राहाण्यासाठी आसरा शोधायचा, फीटस् येणार्‍या बहिणीवर उपचार करायचे आणि मुंबईच्या घरीही जायचंय, अशा तीन आघाड्यांवर लढाई सुरू पण नियतीच्या मनात वेगळच होतं… 
 

माघारी जाणे तर शक्य नव्हते. मुंबईकडे जायचे तर अनेक अडथळे होते. अखेर भावंडांनी रात्री दोन वाजता बहिणीवरील पचारांना प्राधान्य देऊन मुंबईकडे कूच केले. सोमवारी रात्री तीनच्या सुमारास महाड चेकपोस्टवर पोलिसांनी थांबविले. पुन्हा सारी चौकशी. सोबतची पत्रे दाखवून अजिजी हे सोपस्कारही झाले. तेथील अधिकार्‍यांनी हातानेच पुढे चला असा सिग्नल दिला. त्यानंतर पळस्पे फाट्यावर पोलिसांनी थांबविले. तेथील अधिकार्‍यांचे समाधान होईना. पुन्हा सारी कथा आणि आजारी बहिणीची व्यथा सांगितली. डॉक्टरांची पत्रे महत्त्वाची ठरली. सखोल चौकशीनंतर तेथेही हिरवा सिग्नल मिळाला. सकाळी 10 वा. मुंबईत शिरताना फारशी समस्या उद्भवली नाही. 17 मार्चला सुरू झालेला हा प्रवास 14 एप्रिलला मानवी स्वभावांच्या विविध अनुभवांची शिदोरीसोबत घेऊन पूर्ण झाला.

या भावंडांच्या कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढिल लिंकवर क्लिक करा – अखेर महिनाभराने तीनही भावंडे आई-वडिलांच्या कुशीत….

संघ कार्यकर्त्यांचा आधार

तीनही मुले पोलीस ठाण्यात असल्याचे कळल्यावर त्यांच्या पालकांनी संघ कार्यकर्त्यांची मदत घेतली. महिनाभराच्या काळात गुहागरमधील संघ कार्यकर्ते मदत करत होते. मुंबईच्या प्रवासात काही संकट आलेच तर संपर्क साधायला सतत मदत करणारा विशालहृदयी मित्र आणि संघ कार्यकर्त्यांचे नेटवर्क हा मोठाच आधार होता.

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply