kinwat today news
काही-सुखद-!-85-कुटुंबांची-जबाबदारी-'हा' गावच-पेलणार 

काही सुखद ! 85 कुटुंबांची जबाबदारी 'हा' गावच पेलणार 

दाभोळ ( रत्नागिरी ) – गाव करी ते राव न करी ही उक्ती कोरोना प्रादूर्भावाच्या काळात दापोली तालुक्‍यातील टाळसुरे व नारगोली गावातील ग्रामस्थांनी सार्थ ठरवली. या काळात या दोन्ही गावातील गरजू 85 कुटुंबांची जबाबदारी गावाने स्वीकारली. तसे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने दापोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. लोकवर्गणी काढून या गावातील 85 गरजू कुटुंबाना अन्नधान्यासह सर्व आवश्‍यक मदत ग्रामस्थ करणार आहेत. 

शासनाकडून मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सेवाभावी संस्थांकडून कोणत्याही मदतीचा पुरवठा आमच्या गावाला करण्यात येऊ नये ती मदत अन्य ठिकाणी करण्यात यावी, असे पत्र ग्रामपंचायतीकडून दापोलीचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या पत्रावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जलगावकर तसेच दोन्ही गावच्या पोलिसपाटील यांच्या सह्या आहेत. टाळसुरे ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्‍यातील इतर ग्रामपंचयतीनीही घ्यावा व गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले आहे. 

आपण सर्वजण देशाचे सुबुद्ध नागरिक असून नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, प्रत्येक गोष्ट शासनानेच करावी, अशी अपेक्षा न करता देशाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून टाळसुरे व नारगोली येथील सर्वसामान्य नागरिकांसह सर्वांनी गरजू कुटुंबाना मदत करण्याचे ठरवले आहे. 
– जयवंत जालगावकर, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, टाळसुरे  

 
 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply