kinwat today news
हॉटस्पॉट-राज्यांना-टेस्टिंग-किट;-देशातही-सरकार-किटचे-उत्पादन-सुरू-करणार 

हॉटस्पॉट राज्यांना टेस्टिंग किट; देशातही सरकार किटचे उत्पादन सुरू करणार 

नवी दिल्ली – ईशान्येकडील राज्यांना कोरोनाचा संसर्ग थोपविण्यात मोठे यश आले असून कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या राज्यांना रॅपिड टेस्टिंग किट पुरवण्यात येत आहेत. देशात मेपर्यंत दहा लाख टेस्टिंग किट तयार करणे सुरु होईल असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचा दर्जा खराब असेल तर ते वापरले जाणार नाही. इतर देशांमधून येणारी आणि देशात तयार होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता तपासूनच ती रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष वापरण्यासाठी परवानगी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अगरवाल म्हणाले की, ‘‘ चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी आणखी तीस प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. देशभरात १ लाखांहून जास्त रुग्णांवर उपचारांची क्षमता असलेली १९१९ रुग्णालये सज्ज आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आजही विविध राज्यांबरोबर चर्चा करून राज्यांना औषधांचा पुरवठा तसेच उपचारांबाबत विस्तारित सूचना दिल्या.’’ 

टपाल विभागाचे कौतुक 
अगरवाल यांनी सांगितले की, ‘‘ कोरोना लॉकडाऊनच्या काळात टपाल विभागाने मालवाहू विमानांच्या माध्यमातून औषधे आणि व्हेंटिलेटरची विशेष व्यवस्था करून १०० टनांपेक्षाही जास्त वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली आहे. बँक सेवेद्वारे लाखो पोस्टमननी ग्रामीण भागातील दोन कोटींहून जास्त गरजूंना आर्थिक मदत पोचविली. या काळात मोबाईल व बॅंक, टपाल विभागांनी आपल्या विशेष सेवेद्वारे लक्षणीय काम केले आहे.’’ कोरोना रुग्णांसाठी ‘बीसीजी’ची लस पूर्ण सुरक्षित असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही असे आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. ही लस व कोरोना विषाणूबाबत लवकरच आयसीएमआर संशोधन करेल, त्यानंतरच सविस्तर माहिती सांगता येऊ शकते. आतापर्यंत ३ लाख १९ हजार चारशे चाचण्या घेण्यात आल्या असून काल एका दिवसात २८ हजार ३४० चाचण्या घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply