kinwat today news
बबिताकुमारी-फोगटविरोधात-औरंगाबाद-पोलिसांत-तक्रार 

बबिताकुमारी फोगटविरोधात औरंगाबाद पोलिसांत तक्रार 

औरंगाबाद : जगभरात कोरोनाला हरविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. दुसरीकडे याच कोरोनावरून दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशी टिप्पणी करण्याचेही प्रकार घडत आहेत. भारताला पदक जिंकून दिलेली महिला खेळाडू बबिताकुमारी फोगट व रंगोली चंदेल यांनी कोरोनाच्या फैलावावरून मुस्लिम समाजाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावरून जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात येथील सिटी चौक पोलिसांत खिजर पटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा : थेट कोरोना बाधितांच्या वाॅर्डातुन, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले, की बबिता या फ्रीस्टाईल रेस्टलर असून, त्यांनी भारताला पदक जिंकून दिले आहे. त्यांच्या जीवनावर ‘दंगल’ हा सिनेमा आलेला आहे. त्यांचे सोशल मीडियावर जगभरात असंख्य फॉलोअर्स आहेत. भारतात कोरोनाचा संसर्ग हा तबलिगींमुळे पसरत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो – उद्योजक सुनील किर्दक

देशात अनेक ठिकाणी समाजावर हल्ले झाले आहेत. गरीब फळे-भाजी विक्री करणाऱ्या लोकांना हिंदू कॉलनी, गावांमध्ये येण्यास बंदी घातली आहे. 
असे असताना त्यांनी पुन्हा एक पोस्ट टाकून टिप्पणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

रंगोली चंदेलवरही करा गुन्हा दाखल! 
एका प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण असलेल्या रंगोली चंदेल यांनीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. दोन समाजांत तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सिटी चौक पोलिसांत केलेल्या तक्रारीत केली आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply