kinwat today news
रत्नागिरीतील कोरोनाग्रस्तांसाठी-`हे`-ठरलेत-देवदूत 

रत्नागिरीतील कोरोनाग्रस्तांसाठी `हे` ठरलेत देवदूत 

रत्नागिरी – जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. प्रकाश जांभूळकर हे कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आणि प्रचंड दडपण आहे. सहाजणांना लागण झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतली. पण या महाभयंकर संकटात डॉ. जांभूळकर यांनी जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी लिलया पेलली आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणुंचा राज्यात शिरकाव झाला, त्यांनतर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला. तेव्हापासून वैद्यकीय विभागातील सर्व मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत.

तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत शृगारतळी (ता. गुहागर) येथील एक रुग्ण बरा होऊन घरी गेला. तर तीन रुग्णांसह एका सहा महिन्याच्या बालकावर यशस्वी उपचार सुरु आहेत. कोरोना रुग्ण इतर रुग्णांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना उपचारासोबतच आधार देते त्यांचे मानसिक बळ वाढविण्याचे कामही हेच डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी करत आहेत. कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर राहुन ते सेवाभाव जपत आहेत. 

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एकमेव एमडी मेडिसिन फिजीशयिन डॉ. जांभूळकर कार्यरत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला बरे करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या सोबत डॉ. जांभूळकर यांची आहे. दिवसातून दोन वेळा कोरोना बाधित रुग्णाची तपासणी करणे, त्यांची चौकशी करणे.

त्यांच्यामध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची ऊर्जा निर्माण करण्याचे कामही डॉ.जांभूळकरच करत असून त्यांना  निकीता हळदवणेकर, सुप्रिया सुर्वे, आसावरी चिथळे, संयुक्त साळवी, अरुण डांगे, हर्षा गुडेकर, पुनम लाटे, वैष्णवी पवार, शशिकला कदम, गायत्री गोराठे, मनीषा काळे, सुप्रिया सुतार, वर्षा दवंडे, अंकित आठल्ये आदींचे मोलाचे सहकार्य मिळते. 

कामाचे स्वरूप बदलले 

कोरोना विभागात त्यांची डॉ. जांभूकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कामाचे स्वरूप बदलले आहे. सकाळी 9 वाजता रुग्णालयात आल्यानंतर प्रथम जनरल रुग्णांची तपासणी, त्यानंतर ते संशयित कोरोना रुग्णांची तपासणी, त्यांना उपचार, मार्गदर्शन करतात. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी. प्रत्येक रुग्णाला भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्यावर उपचार करतात. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply