kinwat today news
आता-नगरपालिका-हद्दीत-होणार्‍या-मुत्यूची-नोंद-करणे-बंधनकारकच………

आता नगरपालिका हद्दीत होणार्‍या मुत्यूची नोंद करणे बंधनकारकच………

खेड  (रत्नागिरी) :  नगरपालिका हद्दीत होणारे नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यूंची नोंद करणे आता मृतांच्या नातेवाईकांना बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर तातडीने हा निर्णय लागू करण्यात आला आहे. हा आदेश मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नियंत्रण अधिकारी संतोष जाधव तसेच त्यांना सहाय्य करणारे अन्य दोन कर्मचारी यांना काढला आहे. माहितीसाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना या आदेशाची प्रत देण्यात आली आहे.

मृत्यूची नोंद करण्यासाठी दहन करणे वा दफन करणे दोन्हीकरिता प्रत्येकी शंभर रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याची रितसर पावती पालिका देणार आहे. स्मशानभुमी मध्ये दहन करणे तसेच दफनभुमीमध्ये दफन करण्यात येणार्‍या मृत व्यक्तीची नोंद घेणे व नियंत्रण ठेवणे या कामाला तीन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी नगरपालिकेत तसेच आप आपल्या प्रभागातील  नगरसेवकांकडून अधिक माहिती घ्यावी. याबाबत मुख्याधिकारी श्री.शिंगटे यांनी सकाळ ला अधिक माहिती देताना सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधित व मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती तात्काळ मिळणे आवश्यक आहे.

हेही वाचा- विनाकारण फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी बनवला असाही सेल्फी पॉईंट….

नगरपरिषद क्षेत्रातील स्माशानभुमी व दफनभुमीत दहन  व दफन केलेल्या व्यक्तीची नोंद नगरपरिषदेकडे केली जात नाही.मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती तात्काळ उपलब्ध होत नसल्यामुळे मृत्यूचे कारण समजत नाही. शहरात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद सबधित व्यक्तीच्या नातेवाईंकाकडून उशीराने नगरपरिषदेत केली जाते. त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण विलंबाने नगरपरिषदेला समजते. त्यामुळे कोरोना व इतर साथीवर नियंत्रण मिळवणे यात अडचणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- रेठरेधरणच्या त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह! –

मृत व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजल्यास झालेला मृत्यू साथीचा किंवा गंभार स्वरूपाचा आजार असल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होते. त्याकरीता मृत्यूची नोंद नगरपरिषदेकडे होणे आवश्यक असल्याचे श्री.शिंगटे म्हणाले.  खेड मधील एखादी व्यक्ती आजारी पडून किंवा अपघातात अन्य गावात मृत झाली असेल आणि त्यांच्या नातेवाईकांना खेडमध्ये अत्यंविधी करावयाचा असल्यास त्याची नोंद देखिल करूनच दहन अथवा दफन करता येईल असेही त्यांनी स्पष्ठ केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply