kinwat today news
कोरोना-संदर्भात-मोठी-आणि-दिलासादायक-बातमी,covid19 रुग्णसंख्या…,

कोरोना संदर्भात मोठी आणि दिलासादायक बातमी,COVID19 रुग्णसंख्या…,

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आल्याचे दिसत असून, मृत्युदरही घटला आहे. शुक्रवारी मुंबईत 77 कोरोनाबाधित सापडले आणि पाच रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी 77 नवीन कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांची संख्या 2120 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून निम्म्यावर आली आहे. आणखी पाच बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींची संख्या 121 वर गेली आहे. या पाच जणांपैकी तिघांना दीर्घकालीन आजार होते, तर अन्य दोघांचा मृत्यू वार्धक्‍याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. 

VIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण
 

महापालिकेने सात ठिकाणी एकूण 519 खाटांची व्यवस्था असलेली कोरोना केअर सेंटर्स सुरू केली आहेत. तेथे आतापर्यंत 473 कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले आहे. प्रतिबंधित परिसरात सहवासितांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या 115 विशेष दवाखान्यांत 4453 नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि 1761 संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. 

मुंबईतील 1158 रुग्णांचा शोध प्रतिबंधित परिसरातील सर्वेक्षणादरम्यान लागला. एकूण 38 हजार 990 इमारतींच्या आवारांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शुक्रवारी 201 नव्या संशयित रुग्णांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. 

मोठी बातमी – वाडिया हॉस्पिटल वाचवा, कोरोना रुग्ण असल्याचा स्टाफचा धक्कादायक दावा

धारावीत शुक्रवारी नवीन 15 कोरोना रुग्ण आढळून आले. माटुंगा लेबर कॅम्प येथे 4, मुस्लिम नगरमध्ये 3, इंदिरा नगर 3, लक्ष्मी चाळ 1, सर्वोदय सोसायटी 1, जनता सोसायटी 1, सोशल नगर 2 अशा एकूण 15 रुग्णांची भर आज पडली आहे. तर, एका 62 वर्षीय रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 100 पार झाली असून धारावीतील 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

239 जण कोरोनामुक्त 
आतापर्यंत 5879 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बऱ्या झालेल्या आणखी 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे आतापर्यंत 239 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

yet another day when covid 19 patients count dropped in mumbai

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply