kinwat today news
धान्योत्पादनाचे-विक्रमी-लक्ष्य-२९८.-३-दशलक्ष-टन 

धान्योत्पादनाचे विक्रमी लक्ष्य २९८. ३ दशलक्ष टन 

नवी दिल्ली – देशात सध्या कोरोना संसर्गाचा प्रसार वाढल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. लॉकडाउनमुळे सध्या सर्व उद्योग ठप्प पडलेले असताना केंद्र सरकारकडून कृषीउद्योगाला काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान, आगामी पीक वर्षात २०२०-२१ मध्ये (जुलै ते जून) विक्रमी धान्योत्पादनाचे लक्ष्य २९८.३ दशलक्ष टन निश्‍चित केले आहे. हे ध्येय मागील वर्षाच्या अंदाजित उत्पादनाच्या सुमारे ६३ लाख टन अधिक आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल खरीप पीक संमेलन २०२० मध्ये व्हीडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, की राज्यांनी खरीप पिकांचे ध्येय गाठण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असून कोरोनाच्या संकटाची झळ ही ग्रामीण भागाला, गरीबांना आणि शेतकऱ्यांना बसू नये यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे . पंतप्रधान पीक विमा योजना आणि माती आरोग्य कार्ड योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात असेही आवाहन कृषीमंत्र्यांनी राज्यांना या वेळी केले. 

२०२०-२०२१ साठीचे धान्योत्पादनाचे लक्ष्य (दशलक्ष टनमध्ये) 
खरीप: १४९.९२ 
रब्बी: १४८.४ 

तांदूळ : ११७.५ 
गहू: १०६ 
कडधान्य: २५.६ 
तेलबिया: ३६.६४ 
भरडधान्य : ४८.७ 

गतवर्षी अधिक उत्पादन 
२०१९-२० साठी रब्बीचे उत्पादन ९९ दशलक्ष टन ठेवलेले असताना १०६ दशलक्ष टन उत्पादन झाले. 

लॉकडाउनमुळे शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी अखिल भारतीय कृषी वाहतूक कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 
नरेंद्रसिंह तोमर, कृषी मंत्री 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply