kinwat today news
शाळांनी-शुल्कवाढ-थांबवावी;-केंद्रीय-मनुष्यबळ-विकासमंत्र्यांचे-आवाहन 

शाळांनी शुल्कवाढ थांबवावी; केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचे आवाहन 

नवी दिल्ली – कोरोनासारख्या भयंकर आपत्तीच्या काळात लॉकडाउन सुरू असताना देखील शाळांकडून होणारी शुल्क वसुली आणि शुल्कवाढीचा प्रयत्न यावर सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. शाळांनी वार्षिक शुल्कवाढ टाळावी आणि तीन महिन्यांचे शुल्क एकत्र घेऊ नये, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातून पालकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी हे आवाहन करताना राज्यांनीही याबाबत योग्य दखल घ्यावी, अशी सूचना केली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून शाळांना आणि राज्य सरकारांना याबाबत आवाहन केले. पोखरियाल यांनी म्हटले आहे, ‘‘ संसर्गाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानवीय मुल्यांना प्राधान्य देण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे सर्व शाळांपुढे आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची चिंता असेल. राज्यांमधील शिक्षण खाते देखील पालक आणि शाळांच्या हितांची जपणूक करण्यासाठी योग्य पावले टाकत असतील. काही राज्यांनी सकारात्मक निर्णय केले आहेत.’’ 

‘सीबीएसई’चे राज्यांना पत्र 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न विनाअनुदानित खासगी शाळांकडून होणाऱ्या सक्तीच्या शुल्कवसुलीबद्दल तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबद्दल  ‘सीबीएसई ’ने सर्व राज्यांना पत्र पाठविले आहे. शुल्क आकारणी राज्यांच्या शिक्षण विभागाच्या नियमांनुसारच केली जावी आणि या शुल्काची वसुली कशा प्रकारे केली जावी हे राज्य सरकारांनी ठरवायचे आहे. लॉकडाउनच्या काळात एकत्रित शुल्क भरण्याचा शाळांचा आग्रह तसेच शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात याकडे राज्य सरकारांनी लक्ष द्यावे, असे सीबीएसईने कळविले आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply