kinwat today news
फोनच्या-एका-रिंगवर-मिळणार-आता-पैसे-:-कसे-ते-वाचा….

फोनच्या एका रिंगवर मिळणार आता पैसे : कसे ते वाचा…..

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने स्वतःच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जाणे मुश्किल झाले आहे. त्यातच, अनेक गावांमध्ये मोबाईलला रेंज वा इंटरनेट नसल्याने डिजीटल सेवाही घेणे मुश्किल झाले आहे. अशाप्रकारे लॉकडाऊनमुळे काहीशा प्रतिकूल झालेल्या स्थितीमध्ये राजापूर अर्बन बँकेची ‘बँक ऑन व्हिल्स’ ही बँकींग सेवा वयोवृद्ध, पेन्शनधारकांसह हजारो ग्राहकांची पैशाची निकड भागवत आहे. या सेवेंतर्गंत राजापूर अर्बन बँकेतर्फे मोबाईल वा फोनच्या एका रिंगवर गरजवंताला घरपोच पैसे उपलब्ध करून देत आहे. बँकेच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.

राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक शाखांमधून लोकांना ही सुविधा दिली जात आहे. त्यातून, दिवसाला आठशे ते हजार लोकांची पैशाची निकड भागविली जात असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली. ‘बँक ऑन व्हिल्स’ या सुविधेमध्ये दिवसाला सुमारे पाच लाख रूपयांची उलाढाल होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारची बँकींग सेवा देणारी राजापूर अर्बन बॅक कोकणातील पहिली बॅक ठरली आहे.

हेही वाचा- कोर्टाच्या तारखांसाठी हेलपाटे मारू नका..वाचा –

बँक ऑन व्हिल्स’ सुविधा

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून संचारबंदीही जाहीर केली आहे. त्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी घोळका करून फिरणे वा घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याला सवलत देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने लोकांना आजारपणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसह अन्य विविध कारणांसाठी पैशाची निकड तीव्रतेने जाणवू लागली आहे.

हेही वाचा- चिपळुणला वादळाचा जोरदार तडाखा ; कोट्यावधींचे नुकसान

बँक खात्यामध्ये पैसे आहेत मात्र​

संचारबंदीमुळे घराबाहेर पडणेच मुश्किल झाल्याने, त्यामध्येदुचाकी असो वा चारचाकी वाहनांच्या फेर्‍यांवरही पायबंद घालण्यात आल्याने समस्या अधिकच गुंतागूंतीची झाली आहे. अशा स्थितीमध्ये पैशासाठी लोकांना डिजीटल सुविधेवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, अनेक गावांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यातच, काहींनी मोबाईल बँकींग सुविधा सुरू केलेली नाही. अशा स्थितीमध्ये बँक खात्यामध्ये पैसे आहेत मात्र, ते मिळवायचे कसे ? असा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे. अशा स्थितीमध्ये राजापूर अर्बन बँकेची ‘बँक ऑन व्हिल्स’ ही सुविधा धावून आली आहे.

हेही वाचा- सांगली परिसरातील 44 स्पॉट पोलिसांकडून लॉक –
लिस्ट सॉफ्टवेअर प्रा. लि. या संस्थेने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अर्बन बँक ही सुविधा लोकांना उपलब्ध करून देत आहे. या सेवाचे लाभ रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राजापूर अर्बन बँकेच्या शाखांद्वारे वयोवृद्ध, पेन्शनधारक यांच्यासह अनेकांना होत आहे.  लॉकडाऊन काळातील राजापूर अर्बन बँकेच्या या सामाजिक बांधिलकी कॅब सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply