kinwat today news
lockdown-:-नगरच्या-'एसपीं'ना-भावला-नाकाबंदीचा-'पुणेरी-पॅटर्न'!

Lockdown : नगरच्या 'एसपीं'ना भावला नाकाबंदीचा 'पुणेरी पॅटर्न'!

पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचा पॅटर्न नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) अखिलेश कुमार सिंह यांना खूपच भावला. एका जिल्ह्याचे पोलिस प्रमुख असलेल्या सिंह यांनाही तपासल्यानंतरच पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश दिला.

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील घोडनदी तपासणी नाक्यावर काल रात्री उशिरा हा प्रसंग सिंह यांनी अनुभवला आणि  हाच पॅटर्न नगर जिल्ह्यात सुरू करण्याची इच्छाही त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे बोलून दाखवली.  

– रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या…

पुणे जिल्ह्यात ३० ठिकाणी असे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या नाक्यांवर प्रत्येकी दोन कर्मचारी चोवीस तास तैनात करण्यात आलेले आहेत. ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार जिल्हा पशुविकास अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व पशुवैद्यकीय अधिकारी आणि पर्यवेक्षक ही तपासणी करत आहेत. यासाठी प्रत्येक नाक्यावर संपर्कविरहित थर्मामीटर उपलब्ध करून  देण्यात आले आहे.

– ‘डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर…’; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!

गुरुवारी (ता.१६) रात्री अकरा वाजता अखिलेश कुमार सिंह हे नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सिमेवरील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिरूर येथील घोडनदी नाक्यावर आले होते. तेव्हा त्यांनाही तपासणी नंतरच पुणे जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला. पशूधन पर्यवेक्षक डॉ. मुकूंद देंडगे यांनी ही तपासणी केली.

– ‘धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही’; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

तपासणीनंतर सिंह यांनी त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कर्तव्यपूर्तीचे तोंडभरून कौतुकही केले. शिवाय ही पद्धत नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केली. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्यांचे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून विशेष कौतूक केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply