kinwat today news
lockdown-:-राज्यात-50-हजार-गुन्हे-दाखल 

Lockdown : राज्यात 50 हजार गुन्हे दाखल 

मुंबई – लॉकडाउन दरम्यान कलम 188 नुसार राज्यात आतापर्यंत 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी 10 हजार 276 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न गुन्हेगार व समाजकंटक करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून राज्यात 227 गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक, फेसबुक, ट्‌विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत राज्यातील पोलिस ठाण्यांत आठ अदखलपात्र गुन्ह्यांसह 227 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 555 व्यक्तींना पोलिसांनी शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 102 घटनांची नोंद झाली असून, 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply