kinwat today news
breaking-:-मालेगावमध्ये-कोरोनाचा-कहर!-आणखी-14-कोरोना-पॉझिटिव्ह

BREAKING : मालेगावमध्ये कोरोनाचा कहर! आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक/मालेगाव : मालेगावमध्ये कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून, शुक्रवारी (ता.17) सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये आणखी 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 वर पोचली आहे. त्यापैकी 61 रुग्ण मालेगावमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमधील दोघांचा यापूर्वीच मृत्यू झाल्याने, कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला असून, चौघेही मालेगावचेच आहेत. 
शुक्रवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह न आल्याने आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला होता. परंतु, सायंकाळी उशिरा 14 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 81 वर्षीय डॉक्‍टर व एका 55 वर्षीय महिलेचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित महिला (रा. धोबी गल्ली) 13 एप्रिलला रुग्णालयात दाखल झाली होती. पॉझिटिव्ह आढळून आलेले रुग्ण हे पूर्वीचे पॉझिटिव्ह रुग्णांचेच नातेवाईक आहेत. अन्य 29 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  

* नव्याने 14 बाधित; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 70 वर 
* सोमवारी मरण पावलेली 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह 
* वृद्ध डॉक्‍टरचा सकाळी मृत्यू, सायंकाळी बाधित अहवाल

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

दरम्यान, जिल्ह्यातील 808 कोरोना संशयितांच्या 811 नमुन्यांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. त्यातील 512 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह, तर 56 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 244 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवारपर्यंत 467 संशयित रुग्णांना तपासणीअंती आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याने घरी सोडण्यात आले. 
— 
कोरोनाबाधितांची सद्यःस्थिती 
* जिल्हा रुग्णालय : 7 
* नाशिक महापालिका रुग्णालय : 2 
* मालेगाव : 61 
* एकूण : 70 
* मृत 4 (1 धुळ्यातील मृत युवतीसह) 
* कोरोनामुक्त : 1  

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो “तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले ‘एसीपी’ आम्ही आहोत”!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply