kinwat today news
उरुळी-कांचनमधील-महिलेला-कोरोनाची-लागण 

उरुळी कांचनमधील महिलेला कोरोनाची लागण 

लोणी काळभोर – येथील एका बड्या खासगी रुग्णालयात एक 47 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही महिला उरुळी कांचन येथील (ता. हवेली) रहिवासी असून, अंगात ताप असल्यामुळे गुरुवारी (ता. 16) दुपारी रुग्णालयात दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी कोरोना चाचणी केली असता, ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, पूर्व हवेलीत हा पहिलाच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला असून यामुळे उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या महिलेची व तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले. 

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “उरुळी कांचनमधील महिलेला कोरोनाची लागण 

 1. May I simply just say what a comfort to find someone who actually
  knows what they are talking about on the net. You actually understand how
  to bring an issue to light and make it important.

  More people must read this and understand this side of the story.
  I was surprised that you aren’t more popular since you surely
  possess the gift.

Leave a Reply