kinwat today news
#video:-मानखुर्दमध्ये-फेरीवाल्यांची-मुजोरी!-पालिका-अधिकाऱ्यांसह-पोलिसांना-मारहाण

#VIDEO: मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी! पालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांना मारहाण

मानखुर्द : मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीत मुजोर फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी तसेच पोलिसांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. 17) घडली.  येथील लल्लुभाई वसाहतीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका तसेच पोलिसांचे पथक गेले होते. या पथकातील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच महिला पोलिसांनाच या मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केली. या फेरीवाल्यांना ताब्यात घेत मानखुर्द पोलीस ठाण्यात नेल्यानंतरही त्यांनी तिथे गोंधळ घातला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे. एकाचा शोध सुरू आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मानखुर्दच्या विविध रस्त्यांवर फेरीवाले व नागरिक या संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करत आहेत. अशा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मानखुर्द पोलिस व होमगार्डच्या संरक्षणात पालिकेचे पथक शुक्रवारी लल्लुभाई वसाहतीमध्ये गेले होते. येथे एक हातगाडी पालिकेचे अधिकारी जप्त करत असताना फेरीवाला महिलेने विरोध केला व नंतर महिला पोलीसांना मारहाण करण्यास सुरूवात केली. स्वतःजवळील दोनशे ग्रॅमचे वजनाच्या मापाच्या ठोकळ्याने तिने महिला पोलिसांना मारहाण केली. त्यामध्ये शीतल माने व देवयानी कुटे या महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्या. तसेच, या फेरिवाला महिलांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मारहाण केली. 

याप्रकरणी पोलिसांनी यास्मिन शेख (40), तिचा भाऊ नवाजुद्दिन शेख (32), आई साफिया शेख (62) व दुसरा भाऊ अकबर शेख यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. अकबर शेख फरार असून तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या महिलांनी पोलीस ठाण्यातदेखील पोलिसांना शिवीगाळ व मारहाण करत ठाण्यातील फाईली भिरकावल्या व स्वतःचे डोके आपटून गोंधळ घातला.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

Hawkers beaten municipality officer as well as police 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply