kinwat today news
राजकारण्यांनो!-मदत-नको,-हस्तक्षेप-आवरा

राजकारण्यांनो! मदत नको, हस्तक्षेप आवरा

पिंपरी – कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. संक्रमित व्यक्ती शोधण्यापासून त्यांच्यावर प्रभावी उपचार करणे, लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना नियोजन करावे लागत आहे. बंदोबस्तासाठी त्यांना पोलिसांची चांगली साथ मिळत आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. गोपनीय माहितीसाठी प्रशासनाच्या अगोदर आपापल्या प्रभागात व्हायरल केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे “राजकारण्यांनो!, मदत नको पण, हस्तक्षेप आवरा,’ असे सांगण्याची वेळ आली असल्याचे गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांवरून दिसते आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सध्याच्या मंडईंच्या ठिकाणांऐवजी लगतच्या मोकळ्या मैदानांवर सोशल डिस्टसिंग राखून फळे व भाजपाला विक्री केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने ठरविले. त्याबाबतचे नियोजन अपूर्ण असताना अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात संदेश फिरवला. प्रत्यक्षात काही अटींवर ही सुविधा द्यायची होती. काही ठिकाणांमध्ये बदल करायचे होते. त्यापूर्वीच संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. तसेच, अशी केंद्र टप्प्याटप्प्याने 46 ठिकाणी सुरू करण्याचे निश्‍चित झाले होते. त्यांची यादी तयार होती. ती यादीच व्हायरल झाली आणि गोंधळात आणखी भर पडली. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

“पॉझिटिव्ह’मुळे खळबळ 
कोरोना संसर्ग झाल्याचा रिपोर्ट एनआयव्हीकडून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे येतो. त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाते. शिवाय, महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल रुग्णांचीच माहिती महापालिका प्रशासन देऊ शकेल. काही जण पुण्यातील रुग्णालयात दाखल होतात किंवा तपासणी करतात. त्यांच्या बाबतची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळते व प्रशासनाच्या अगोदर आपापल्या भागात संदेश फिरवून ते मोकळे होतात. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर त्यांचा एनआयव्हीकडील अहवाल यायला किमान 24 तास लागतात. त्या काळासाठी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात ऍडमिट केले जाते. त्याबाबतही “पॉझिटिव्ह’ म्हणून संदेश फिरतो व नागरिकांमध्ये घबराट पसरते. 

फोटोसेशन आवरा 
गरजू, गरीब, दिव्यांग व्यक्तींच्या निवास व भोजनाची व्यवस्था महापालिकेने केली आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केलेले आहेत. मात्र, काही कार्यकर्ते मदत करताना फोटोसेशन करीत आहेत. गरजूंना मदत करतानाचे छायाचित्र व चित्रण सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. केवळ स्वयंप्रसिद्धीसाठी सुरू असलेला हा खटाटोप बंद करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशा व्यक्तींवर काही संवेदनशील व्यक्तींकडून टिकाही केली जात आहे. त्यामुळे आपण मदत देत असलेली व्यक्ती “गरजू आहे, भिकारी नव्हे,’ याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply