kinwat today news
यंदा-जुळून-येईनात-रेशीमगाठी;लॉकडाउनमुळे-लग्नसोहळे-रद्द

यंदा जुळून येईनात रेशीमगाठी;लॉकडाउनमुळे लग्नसोहळे रद्द

पिंपरी – नवराही तयार, नवरी पण तयार मग घोडं अडलंय कुठं, अहो मुहुर्तही आहे…मग झालंय तरी काय…लॉकडाउन…होय याच लॉकडाउनने घोळ केलाय. सर्वच ठप्प असल्याने लग्नसमारंभही रखडलेत. मग आता काय… घरच्या घरी लग्न किंवा बघा दिवाळीची वाट. यावर्षी जुळून येईना रेशीमगाठी अशीच परिस्थिती सगळीकडे झाली आहे. या महिन्यात २६ व २७ रोजी मुहुर्त असूनही लग्नसोहळे मात्र, रद्द झाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये या निमित्ताने आनंदाला उधाण असते तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठा खर्चही केला जातो. लग्नबेडीवर पाऊल ठेवण्यासाठी अनेकांनी मार्च, एप्रिलमध्ये मुहूर्त धरला होता. मात्र, लॉकडाउनमुळे यावर पाणी फिरले आहे. लग्न जमलेले व जमणार असलेल्या नवरदेव-नवरी मंडळीचा हिरमोड झाला आहे. परिणामी ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ या लोकांवर आली आहे. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लग्न लांबल्याने वधू-वर पक्षाकडून लग्न कसे करणार, यावर फोनवरून सध्या फक्त चर्चा होत आहे. लॉकडाउनमुळे नवरदेवाला नवरीच्या गावाला येता येईना, ना नवरीला नवरदेवाच्या गावाला जाता येई, अशी स्थिती आहे. साखरपुडा झालेल्या जोडप्यांना आता फोनवर बोलून दिवस मोजावे लागत आहेत, तर नवीन लग्न जुळवाजुळवी, पाहण्याचा कार्यक्रमदेखील थांबला आहे. एप्रिलबरोबरच मे महिन्यातमध्ये २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ या तारखा धरण्यासाठी तयार नाही. लॉकडाउन कधी संपेल, हे कोणालाच माहीत नसल्याने वधू व वर पक्षाकडून दिवाळीनंतरच लग्नसोहळ्याचा विचार करू, असे आश्‍वासन मिळत असल्याचे एका वधुपित्याने सांगितले. 

घरच्या घरीच सोहळा 
टाकवे बुद्रुक – मावळात दिवाळीनंतर साखरपुडा व लग्नसराई सुरू होते. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात ब-यापैकी साखरपुडे झाले. अनेक जोडप्यांनी मार्च व एप्रिलमधील तारखा निवडल्या होत्या. त्यासाठी कार्यालयांची नोंदणी झाली होती. मात्र, १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल, अशी आशा होती. परंतु दुसरा टप्पाही ३ मे पर्यंत वाढविला. कार्यालयात होणारे लग्नसमांरभ रद्द झाल्याने आता साध्या पद्धतीने नवरीच्या घरात व मंदिरात असे समारंभ होत आहेत. लग्न पुढे ढकललेल्या जोडप्यांना मे व जूनममध्ये परवानगी मिळेल का, याची धाकधूक आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply