kinwat today news
मोठी-बातमी-–-लॉकडाऊनमध्येही-होणार-टोलवसुली; २०-एप्रिलपासुन-वसुली-सुरु-करण्याचे-आदेश

मोठी बातमी – लॉकडाऊनमध्येही होणार टोलवसुली; २० एप्रिलपासुन वसुली सुरु करण्याचे आदेश

मुंबई : कोरोना विषाणु आणि देशभरात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक सेवा बंद असल्या तरी आता २० एप्रिलपासुन सर्वांना प्रवास करताना टोल मात्र भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे आदेश जारी केले आहेत. १७ एप्रिल रोजी प्राधिकणाने हे आदेश जारी केले असुन या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासजी तसेच व्यावसायिक वाहनांकडुन टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार १५ एप्रिलपासुन ही टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे १५ एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसुचना काढण्यात आली होती.

सर्वात मोठी बातमी ; २० एप्रिल नंतर महाराष्ट्रात ‘या’ गोष्टी होणार सुरु…

 

त्यानंतर आता २० एप्रिलपासुन राज्यातील तसेच देशातील काही भागांमध्ये अटी शर्तींच्या अधीन राहून काही उद्योगधंद्यांना काम सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्यावश्यक तसेच इतर काही वस्तुंची देखील ने-आण करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तसेच खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. ही शक्यता ध्यानात घेऊनच सरकारने आता महामार्गांवरील टोलवसुली देखील सुरु करण्यास मान्यता दिली आहे. 

NHAI issued notification toll collection will start from 2oth of april 2020

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply