kinwat today news
वैद्यकीय-अधिकाऱ्यांमधील-वादामुळे-46-कामगारांची-रात्र-टीबी-रुग्णालयाच्या-आवारातच

वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील वादामुळे 46 कामगारांची रात्र टीबी रुग्णालयाच्या आवारातच

मुंबई : शिवडी येथील क्षयरोग (टीबी) रुग्णालयातील एक कामगाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या टीबी रुग्णालयातील 30 जणांनाही तपासणीसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, तेथून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले; मात्र तिथेही त्यांना तपासणीविनाच माघारी फिरावे लागले. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकृती बिघडल्यामुळे टीबी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची 15 एप्रिलला केईएम रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. टीबी रुग्णालयातील 46 कामगार, 26 परिचारिका, एक परिसेविका व दोन डॉक्‍टर त्याच्या संपर्कात आल्याचे समोर आले. प्रशासनाने या सर्वांना तातडीने केईएम रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. परंतु, तिथे तपासणी करण्यास नकार देऊन त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात पोहोचलेल्या या कर्मचाऱ्यांची तपासणी न करता टीबी रुग्णालयातच क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हे सर्व जण पुन्हा कामगार टीबी रुग्णालयात आले. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

त्यानंतर क्षयरोग रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील वादामुळे गुरुवारची रात्र या कामगारांना रुग्णालय परिसरात काढावी लागल्याचा आरोप केला जात आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत रुग्णालय प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यामुळे सर्व चतुर्थ श्रेणी कामगार वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांना आपण होम क्वारंटाईन होत असल्याचा अर्ज देऊन घरी निघून गेले. कामगारांना रात्रभर रुग्णालयाच्या आवारात राहावे लागल्यामुळे प्रशासन आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत असंतोष पसरला आहे. 

केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयांनी या कर्मचाऱ्यांना टीबी रुग्णालयातच परत पाठवल्याने क्वारंटाईनची व्यवस्था करावी लागली. त्यात अनेक अडचणी आल्याने वेळ लागला. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांनी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. आता रुग्णालयातच विलगीकरण कक्ष तयार झाला आहे. आवश्‍यकता असेल त्यांना तिथे ठेवले जाईल. 
– डॉ. ललितकुमार आनंदे, वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply