kinwat today news
एकीकडे-कोरोनाचे-संकट,-दुसरीकडे-हे…

एकीकडे कोरोनाचे संकट, दुसरीकडे हे…

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) – “कोरोना’च्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मोठ्या आंबा बागायतदारांना आता माकडांच्या उपद्रवामुळेही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. 

आब्यांच्या झाडांना फलधारणेपूर्वी वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे काळजी घ्यावी लागते. आंबा हंगाम संपल्यानंतर लगेचच पावसाळी मोसमात झाडांना शेणखत व खतांचा डोस देणे, बांडगूळ काढणे, महागड्या कीटकनाशक औषधांची फवारणी करणे, मजुरी, मोहोरल्यावर झाडाच्या फांद्या हलवणे, राखण करणे, आंबा तोडणी, आंबा खोका, रद्दी, वाहतूक, दलालांची दलाली या सर्व बाबीसाठी येणारा खर्च विचारत घेता, कधी कधी ना नफा ना तोटा या धर्तीवर आंबा व्यवसाय करावा लागतो. कधी कधी एका वेळेस आंबा परिपक्व झाल्यास आंबा तोडणी करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते; मात्र अनेकांना या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो ही एक जमेची बाजू असते. 

तत्कालीन मुख्यमंत्री व कृषीमंत्री शरद पवार यांनी शंभर टक्के फलोत्पादन योजना प्रभावीपणे राबवली. बागायतदारांनी या योजनेचा पुरेपूर लाभ उठवत मोकळ्या जमिनीवर आंबा बागा तयार केल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आंबा उत्पादनाचा विचार केल्यास उत्पादनाच्या तुलनेत अपेक्षेसारखी निर्यात नाही. त्यामुळे आंब्याला मागणी कमी. शिवाय आंबा पिक 25 टक्के जरी आले तरीही बाजारपेठेतून तेवढी मागणी नसते. सध्या “कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता त्यातच माकडांचा उपद्रव वाढल्याने बागायदार हवालदिल झाले आहेत. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply