kinwat today news
हंगाम-संपलाकमाईचे-सर्व-मार्ग-बंद.रोजच्या-जगण्यासाठी-संघर्ष 

हंगाम संपला..कमाईचे सर्व मार्ग बंद..रोजच्या जगण्यासाठी संघर्ष 

मुंबई : कोरोना विषाणूंमुळे सर्वात प्रथम पर्यटन व्यवसायवर झाला. फेब्रुवारी ते मे हा पर्यटनचा हंगाम आहे. नेमकी याच हंगामामध्ये कोरोना विषाणूंने देशभरात थैमान घातले. पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. यामध्ये काम करणाऱ्या गाईड लोक बेरोजगार झाले. त्यांच्या आता रोजचा जगण्याच संघर्ष सुरू आहे. त्यांना नाही सरकारकडून मदत मिळते तर दुसरी ट्रॅव्हल्स एजंटकडे केलेल्या कामाचे पैसे अडकून बसले आहेत. घरखर्च कसा चालावायचो, घरातील आजारी माणसांच्या उपचारांसाठी पैसे कुठून आणायचे यासाठी संघर्ष सुरू आहे. तर आता काही दिवसात हंगाम संपेल. त्यामुळे कमाईसाठी  पुढच्या वर्षीच्या हंगामाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तो पर्यत दिवस कसे ढकलायचे ? असा प्रश्न गाईडसमोर उभा आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे राज्यभरात एकूण 200 गाई़ड कार्यरत आहे. आज सर्वच गाईडवर बेरोजागार असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागाच अनेकांच्या घरी अन्नधान्याची चणचण आहे. औरंगाबाद येथील सय्यद शेख (नाव बदलले आहे) सांगतात, गेल्या वर्षापासून पर्यटन क्षेत्राला ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी विमान सेवा देणाऱ्या कंपनी बंद पडल्या, तर आता कोरोनामुळे सर्वच ठप्प आहे. औरंगाबाद जिल्हात सर्वात महसून अंजिठा, वेरुळ येथे पर्यटन स्थळातून मिळतो. या हंगामात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक भेट देतात. पण कोरोनामुळे सर्वच रोजगार बुडाला. मला केवळ पर्यटन संबंधी व्यवसायाचे काम येते. आता काहीच काम हाताला नाही. गाईड व्यतिरिक्त विमान, ट्रेन बुकींग काम करतो पण आता ते ही बंद झाले. आधी मिळालेले पैसे किती दिवस पुरणार …खूपच हालत बेकार झाली आहे. सरकारने मदत करावी. मुंबई गणेश वाकळे म्हणाले, लॉकडाऊन पूर्वी ट्रॅव्हल्स एजंट आणि सरकारच्या 15 ते 16 असाईनमेंट केल्या. परंतु त्याचे मानधन अजून मिळाले नाही. ट्रॅव्हल्स एजंट म्हणतात, आम्हाला पैसे मिळाले नाही, वेळ लागेल पैसे ऐयला. जेव्हा येतील तेव्हा देण्यात येतील. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला ही आर्जव केला पण अजून दोघांकडून कोणतीच मदत मिळाली नाही. माझे बरेचसे ग्राहक हे परदेशी असतात. परंतु जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक सर्व सुरळीत झाल्यावर फिरायला येतील याबाबत ही खात्री नाही.

Guides of tourism business in financial crisis

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply