kinwat today news
पिंपरीत-अंध-कलाकारांनी-केले-डोळसपणे-समाजप्रबोधन

पिंपरीत अंध कलाकारांनी केले डोळसपणे समाजप्रबोधन

पिंपरी – आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दृष्टी आणि आवाजाला खूप महत्त्व आहे. आवाज दृष्टीहिनांचे सामर्थ्य तर स्पर्श हे माध्यम. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श हे माध्यम पण त्यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे. आपण सर्वजण सिनेमे, टीव्ही पाहू शकतो. सोशल मीडियावर रमू शकतो. खिडकीतून का होईना सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो. किती बोअर झालोय यार असा सूर ही वारंवार आळवतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्रभरातील अंध कलाकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अंध फेरीवाल्यांसाठी दूत ठरले आहेत. एवढ्यावरच न थांबता डोळसांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, पुणे येथील हातावर पोट असलेल्या रेल्वेतील फेरीवाल्यांसाठी हे अंध धावले आहेत. बऱ्याच जणांनी अन्नधान्य स्वरूपात मदत केली आहे. “तीन पैशाचा तमाशा” यातील हे अंध कलाकार आहेत. या नाटकाचे तीन प्रयोग झाले आहेत. बाकी लॉकडाउनमुळे रद्द झाले आहेत. हे सर्व दृष्टिहीन कोरोनामुळे गावी आहेत. कोणी रोहा, हिंगोली, कोणी म्हाडा, कोणी निगडी व पुण्यातील आहेत. या सर्वांचं समाजभान जागृत आहे. यातल्या अनेक जणांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत अंध फेरीवाल्यांसाठी निधी जमा केला आहे. अनेकांनी आपल्या पगारातला काही भाग त्यांच्यासाठी पाठवला आहे. या उपक्रमासाठी स्वागत थोरात, विना ढोले, ऋचा पाटील यांनी मदत केली आहे.

आम्हांला या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. समाजाकडून ज्ञान आणि भान घेता-घेता देणारे हात तयार झाले आहेत. एक नवी पिढी घडते आहे, असे अंधांच्या सावी फाउंडेशनच्या रश्‍मी पांढरे यांनी सांगितले.

हे आहेत अंधांचे दूत
काकासाहेब पांडव, संतोष कसबे, सुंदर सोंडे, बेला सोंडे, वृषाली शेख, गौरव घायले, बिपीन वर्तक, अक्षय मोहिते, पवन नागरे, हेमांगी धामणे, अद्वैत मराठे, तृप्ती चौधरी, सौरभ चौगुले, प्रवीण पालके, विकी शेट्टी, तेजस्विनी भालेकर.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply