kinwat today news
पुणे-:-६०-हजार-मजुरांच्या-हाताला-मिळणार-काम;-रोजगार-हमीची-कामे-सुरु-होणार!

पुणे : ६० हजार मजुरांच्या हाताला मिळणार काम; रोजगार हमीची कामे सुरु होणार!

पुणे : पुणे जिल्ह्यातील मजूरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेची किमान ३ ते कमाल ५ कामे मंजूर करावीत आणि येत्या सोमवारपासून (ता.२०) प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, असा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिला आहे.

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेच्या या आदेशामुळे जिल्ह्यात किमान सात हजार कामे सुरू होऊ शकणार आहेत. शिवाय या कामामुळे  ६० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

– ‘डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर…’; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!

पुणे जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा (२०२०-२१) एकूण १०६ कोटी रुपयांचा रोजगार हमी योजनेच्या कामांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिलेली आहे. या आराखड्यात सुमारे २५ हजार कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यापैकी निम्मी म्हणजेच सुमारे साडेबारा हजार कामे ग्रामपंचायती तर, तेवढीच कामे अन्य सर्व सरकारी यंत्रणामार्फत करावयाची आहेत.

– ‘धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही’; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान, सध्या लॉकडाउन सुरु असल्याने केवळ गावातील मजुरांनाच नव्हे तर, काम मागेल त्याला हे काम उपलब्ध करून द्यावे. यामध्ये परराज्यातील मजुरांनाही समाविष्ट करून घ्यावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवरील रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी लागतात. यानुसार पहिल्या टप्प्यात गरजेनुसार तीन ते पाच कामे सुरू करणे अनिवार्य केले आहे.                

– Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

जिल्ह्यात गेल्या वर्षी स्वतःला लाख मजुरांची नोंदणी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ६१ हजार मजुरांनीच  रोजगार हमीच्या कामांचा लाभ घेतला होता. दरम्यान, सध्या सर्वच क्षेत्रातील कामे बंद असल्याने आणि मागेल त्या प्रत्येकालाच रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याने मजुरांची संख्या वाढेल, अशी अपेक्षाही आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply