kinwat today news
विनाकारण-फिरणाऱ्यांसाठी-पोलिसांनी-बनवला-असाही-सेल्फी-पॉईंट….

विनाकारण फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी बनवला असाही सेल्फी पॉईंट….

रत्नागिरी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी फाईन भरून बसवून ठेवलेच परंतु सेल्फी पॉईंट तयार करून या पॉईंट समोर सर्व वाहन चालकांचा सेल्फी घेण्याची वेगळीच शिक्षा दिली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळ पासून पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली आहे.

असाही सेल्फी पॉईंट

शुक्रवारी सायंकाळी मारुती मंदिर येथे आगळा वेगळा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. मी घरात न थांबणारा, मी कोरोना पसरणारा, मीच मूर्ख, मी बेजाबाबदार नागरिक, मी ‘सेल्फी’श असा बोर्ड तयार करून या बोर्ड सोबत विनाकारण बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांचा सेल्फी घेण्यात आला. केवळ सेल्फी वरच न थांबता या वाहन चालकांना प्रत्येकी फाईन घेऊन मारुती मंदिर सर्कल मध्ये एक तासापेक्षा अधिक काळ बसवून ठेवण्यात आले. येणाऱ्या कालावधीत ही कारवाई अधिक कठोर करण्यात येणार आहे.

हेही वाचा- चिपळुणला वादळाचा जोरदार तडाखा ; कोट्यावधींचे नुकसान
 

जवळपास ३०० वाहने जप्त

रत्नागिरी शहरातील बहुतांश सुजाण नागरिक जिल्हा प्रशासनाचे आदेश/निर्देशांचे पालन करून आपले राष्ट्रीय, सामाजिक व नैतिक कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. पण काही बेजबाबदार लोक क्षुल्लक कारणाकरीता घराबाहेर पडत असताना दिसत आहेत. त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.जिल्हा वाहतुक पोलीस शाखेकडून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करून १२५९५ वाहनांवर ४३,४२,००० रुपये  दंड वसूल असून जवळपास ३०० वाहने जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा- सांगली परिसरातील 44 स्पॉट पोलिसांकडून लॉक –
 रत्नागिरी शहरातील भुते पान शॉप,  प्रमोद महाजन ग्राउंड, शिवाजी स्टेडियम, नाचणे रोड तसेच थिबा पॅलेस परिसरात जॉगिंग, evening walk, व ईतर किरकोळ कारणांकरीता वावरणाऱ्यांची  २६ वाहने जप्त करुन तसेच ९३ व्यक्तींना पकडून त्यांना मार्गदर्शनाचे खडे बोल सुनावून त्यांचेकडून जिल्हा प्रशासनाचे निर्देशांचे पालन करण्याचे आश्वासन घेण्यात येवून सोडून दिले.बेजबाबदारपणे विनाकारण फिरणाऱ्या वाहनांना जप्त करण्याची मोहीम १७ एप्रिल पासून अधिक तीव्र करण्यात येणार असून आवश्यक त्याठिकाणी संबंधित वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply