kinwat today news
हुश्‍श!-मुंबईवरचा-मोठा-धोका-टळला;-11-हजार-जणांचा-होम-क्वारंटाईनचा-कालावधी-पुर्ण

हुश्‍श! मुंबईवरचा मोठा धोका टळला; 11 हजार जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण

मुंबई : कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता असलेल्या 11 हजार 368 जणांचा धोका टळला आहे. या सर्वांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत आतापर्यंत 2120 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील 57 हजार 700 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 11 हजार 368 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. म्हणजेच त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका टळला आहे. मुंबईत सध्या 8000 “हाय रिस्क’ व्यक्ती आहेत. 
कोरोनाचा शिरकाव चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये झाल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यात एका रुग्णाच्या संपर्कातील सरासरी 27 जणांना क्वारंटाईन करावे लागते. कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तींना सहसा घरातच एकांतात ठेवले जात आहे. 
अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कोरोनाची लागण झाल्यानंतर पाच-सहा दिवसांत ताप, कोरडा खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसतात. विषाणूंची संख्या अब्जावधीवर गेल्याचे ते निदर्शक असते. व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार विषाणूंची संख्या वाढते. 14 दिवसांत विषाणूंची संख्या न वाढल्यास रोगप्रतिकारक शक्ती वरचढ झाल्याचे मानले जाते. त्यामुळे 14 दिवसांचा क्वारंटाईनचा काळ महत्त्वाचा असतो. 

लक्षणे नसलेले देखरेखीखाली 
महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊनही लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मुंबईतही असे 473 रुग्ण महापालिकेच्या देखरेखीखाली आहेत. अशा रुग्णांना लक्षण दिसणाऱ्या रुग्णांबसोबत न ठेवता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. त्यांच्यासाठी 519 खाटा असलेली सात रुग्णालये तयार करण्यात आली आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply