kinwat today news
वाडीया-रुग्णालयाच्या-हलगर्जीपणावर-स्टाफचा-व्हिडीओ-व्हायरल

वाडीया रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर स्टाफचा व्हिडीओ व्हायरल

परळच्या वाडिया या रुग्णालयातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा धक्कादायक दावा रुग्णालयात काम करणाऱ्या एका स्टाफने केला आहे. वैशाली पाटील या गेल्या 22 वर्षांपासून नवरौजी वाडिया रुग्णालयात स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा रुग्णालयातील भोंगळ कारभारावर आवाज उठवला आहे. आता त्यांनी व्हिडीओ तयार करत रुग्णालयात कोरोना रुग्ण आल्याचा दावा केला आहे. 

वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. शिवाय, रुग्णालयात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले पीपीई किट्स, मास्कही नित्कृष्ट दर्जाचे दिले जातात, असंही त्यांनी त्यांच्या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे, वाडिया रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

13 एप्रिल या दिवशी एक गर्भवती महिला रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर या महिलेने आपण कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. पण, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या महिलेला कोरोनाची माहिती देऊ नये असं सांगितलं. त्यानंतर तिला कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत ही महिला काही नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती.

वाडिया रुग्णालयातील 3 लॅब टेक्निशियन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, आयसोलेट वॉर्डमध्ये 8 ते 9 जण दाखल असून त्यात 2 स्टाफ, १ सिस्टर इंन्चार्ज, १ क्लर्क, १ वॉर्डबॉय आणि १ आयाबाई यांना ठेवण्यात आलं आहे. शिवाय, 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे दिवस न पाळत रक्तपेढी, अनेक विभाग सुरू केले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून या सर्व बाबतीत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही या वाडिया रुग्णालयाच्या वैशाली पाटील यांनी केला आहे. 

मोठी बातमी – कसं समजेल सरकार तुमचे  WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

“रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. व्हिडीओत मी जे काही बोलले आहे ते सर्व खरं आहे. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे हे माहित असूनही रुग्णालयाने तिला दाखल करुन घेतलं. नंतर कस्तुरबामध्ये पाठवलं. तोपर्यंत ही महिला बऱ्याच लोकांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संशयित रुग्णालयात असू शकतील. आम्हाला काम करतानाही भीती वाटते. कारण, दिलेले पीपीई किट्स अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यातून आमचा बचाव होणार नाही. त्यामुळे, किमान 2 महिने रुग्णालय सील झालेच पाहिजे..- वैशाली पाटील, सिनियर स्टाफ, वाडिया रुग्णालय, परळ

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply