kinwat today news
बारामतीत-कोरोनाचा-कम्युनिटी-स्प्रेड;-उपाययोजना-राबवण्यास-सुरुवात

बारामतीत कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड; उपाययोजना राबवण्यास सुरुवात

बारामती Coronavirus : शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या मुलगा व नातवाची कोरोनाच्या तपासणीचा अहवाल संध्याकाळपर्यंत न आल्याने पुन्हा एकदा हा अहवाल काय येतो याकडे प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. बारामतीत सामाजिक संसर्गाचा (कम्युनिटी स्प्रेड) धोका उदभवू नये यासाठी उपाययोजनांना प्रारंभ झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान बारामतीत कोरोनाची सामूहिक लागण झाली आहे की नाही याची तपासणी करण्याचा निर्णय आता प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आज ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले होते अशा भागातील तसेच ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे व ज्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे अशा 26 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने अधिक तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान उद्या आणखी काही जणांच्या घशातील द्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. बारामतीत जे कोरोनाबाधित रुग्ण आहे त्यांना कोणाकडून हा विषाणून प्राप्त झाला आहे त्याचा शोध प्रशासकीय पातळीवर वेगाने घेतला जात आहे. सामाजिक संसर्गाचा धोका पोहोचू नये या साठी प्रशासन आता युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा – कोरोनाविरुद्ध लढ्यात राज-उद्धव साथ साथ!

जे ठणठणीत वाटतात अशाच लोकांकडून ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो ही बाब विचारात घेत प्रशासन त्या दृष्टीनेही शोधमोहिम राबवित आहे. सर्वात पहिल्या रिक्षाचालकाला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणाकडून झाला हेही अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने सर्व शक्यता गृहीत धरुन प्रशासन एकत्रित काम करीत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर अचानकच हा संसर्ग वेगाने फैलावू नये या दृष्टीने तपासणी केली जात असल्याचे डॉ. खोमणे म्हणाले.

आणखी वाचा – ऑलिम्पिकमध्ये रमलेला जपान धोकादायक पातळीवर

अधिक तपासणी सुरू
दरम्यान, आजपासून बारामतीत पुन्हा अधिक कडक पोलिस तपासणीला नागरिकांना सामोरे जावे लागले. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केलेली असून ज्यांच्याकडे रस्त्यावर येण्यासाठी ठोस कारण नाही अशांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये या उद्देशानेच ही उपाययोजना केली जात असल्याने नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply