kinwat today news
पिंपरीत-दिलासादायक-बातमी;-हाय-रिस्क-काॅन्टॅक्टमधील-पहिला-रुग्ण-निगेटिव्ह

पिंपरीत दिलासादायक बातमी; हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील पहिला रुग्ण निगेटिव्ह

पिंपरी – शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली आहे. मात्र, त्यातही एक दिलासादायक घटना शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाली. कारण, हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील एका रुग्णाचा 14 दिवसांच्या उपचारानंतरचा व त्यानंतरच्या 24 तासांनी घेतलेल्या नमुन्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, त्यांना पुढील चौदा दिवस होम क्वारनटाइनची सूचना दिली जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 23 जण आले होते.  त्यांच्या संपर्कातील पाच जणांसह 28 जणांच्या घशातील द्रवांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट दोन एप्रिल रोजी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. त्यातील एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचेही रिपोर्ट गुरुवारी (ता. 16) पॉझिटीव्ह तर एकाचे निगेटिव्ह आले होते. काल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचे चोवीस तासांच्या अंतराने घेतलेल्या नमुन्याचा रिपोर्ट ही निगेटिव्ह आला आहे. शहराच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक आहे. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 
दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 52 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात आता आणखी एकाचा समावेश होणार आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply