kinwat today news
पिंपरीत-आठवडे-बाजार-झाले-सुरू;-ज्येष्ठ-नागरिक-आणि-मुलांना-प्रवेश-बंदी

पिंपरीत आठवडे बाजार झाले सुरू; ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना प्रवेश बंदी

पिंपरी : नागरिकांना फळे व भाजीपाला मिळावा, यासाठी शुक्रवारपासून (ता.17) शहरात 16 ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले. मात्र, बाजार परिसरात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त अजित पवार यांनी दिली. 

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आठवडा बाजार सुरू करण्यात आलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे : 

1) केशवनगर, चिंचवड 

2) नव महाराष्ट्र विद्यालय, पिंपरी 

3) सेक्‍टर 29- राधेय हाईटस्‌जवळ रावेत 

4) ड-क्षेत्रीय कार्यालयाशेजारी, औंध-रावेत रस्ता 

5) पिंपळे-निलख बस थांबा मोकळे मैदान 

– पुणे : ६० हजार मजुरांच्या हाताला मिळणार काम; रोजगार हमीची कामे सुरु होणार!

6) शिवशंभो उद्यान, संभाजीनगर 

7) सेक्‍टर-26 जलतरण तलाव, प्राधिकरण 

8) मेहता हॉस्पिटलजवळ, काळभोरनगर 

9) कुस्ती मैदान, 11 नंबर बस स्टॉपजवळ, वाकड 

10) सर्वे क्रमांक 4487 आकुर्डी

– ‘डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर…’; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!

11) सर्वे क्रमांक 497/2 कासारवाडी 

12) अहिल्यादेवी शाळा मैदान सांगवी

13) सम्राट चौक मोरवाडी

14) प्रबोधनकार ठाकरे मैदान, यमुनानगर, निगडी 

15) तुळजाभवानी मंदिर परिसर, मासुळकर कॉलनी 

16) पीसीएमसी मैदान, पिंपळे-सौदागर

– ‘धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही’; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान, आयोजकांनी प्रत्येक गाळेधारक आणि ग्राहकास सॅनिटायझर द्यावे, सॅनिटायझर टनेल वापरावे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, मास्क किंवा रुमाल वापरणे, थुंकू नये, मद्यमान व गुटखा खाण्यास मनाई, ग्राहकांनी भाजीपाल्यास हात लावू नये, दोन गाळ्यांमध्ये किमान चार फुटांचे अंतर ठेवावे, अशा अटींवर बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply