kinwat today news
रुग्णसंख्या-कमी-करण्यासाठी-निकष-बदलू-नका –-देवेंद्र-फडणवीस

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी निकष बदलू नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी आयसीएमआरने तयार केलेल्या निकषात बदल करू नका, अशी विनंती करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. मुंबईत सर्वाधिक चाचण्या केल्या जातात त्यामुळे येथील रुग्णसंख्या जास्त आहे, असे महापालिका आजवर सांगत आली असताना आज अचानक या नियमात बदल करण्यात आला. आता यापुढे मुंबईत सरसकट चाचण्या न करता केवळ संशयितांच्याच चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने त्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

या बदलाची लगेचच दखल घेतली आहे ती भारतीय जनता पक्षाने. रुग्णसंख्या कमी दिसावी यासाठी चाचणीचे निकष बदलणे योग्य कसे, अशी विचारणा फडणवीस यांनी केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या कृत्रिमरित्या कमी दाखवली तर संसर्गाबद्दलची सत्य परिस्थिती लक्षात येणार नाही. आयसीएमआरने ज्या अतिजोखीम व्यक्‍ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्या आहेत अशांची संपर्कापासून पाच ते चौदा दिवसात एकदा चाचणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण देशात ते पाळले जात असताना मुंबई महापालिकेने 12 एप्रिल रोजी लक्षणे दिसत नसल्यास अशा चाचण्या करू नये, असे आदेश काढले आहेत. हे आदेश महानगरातील नागरिकांसाठी धोक्‍याचे ठरू शकतात. अतिजोखीम असलेल्या व्यक्‍तीची चाचणी पाचव्या दिवशी लक्षणे दिसली तरच करावी हा निर्णय संख्या कमी दाखवेल. चीनमध्ये 44 टक्‍के रुग्णांना कोणतीही लक्षणे प्रारंभी दिसत नव्हती. चाचणी सुरू झाल्याने उपचार शक्‍य झाले याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातले निकष ताबडतोब बदलावेत, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढावेत अशी विनंती करण्यात आली आहे. 
(पूर्ण)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply