kinwat today news
जनता-वसाहत-येथील-कालव्यात-१२-वर्षाचा-मुलगा-गेला-वाहून;-शोधकार्य-थांबविले!

जनता वसाहत येथील कालव्यात १२ वर्षाचा मुलगा गेला वाहून; शोधकार्य थांबविले!

पुणे : मित्राबरोबर कालव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला १२ वर्षाचा मुलगा बुडल्याची घटना शुक्रवारी (ता.१७) जनता वसाहत परिसरात घडली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री आठ वाजेपर्यंत मुलाचा शोध सुरू होता.

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रणित दत्ता साबळे (वय १२, रा.जनता वसाहत ) असे कालव्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित हा त्याच्या एका मित्राबरोबर शुक्रवारी दुपारी जनता वसाहती जवळील कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना प्रणितला दम लागल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्यामुळे आरडाओरड करण्यास त्याने सुरवात केली.

– कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज ‘साथ-साथ’

त्यावेळी शेजारून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला पाहिले. तेव्हा त्यांनी सदर घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलीस आणि अग्निशामक दलाचे मुख्य नियंत्रण कक्षातील रेस्क्यु वाहन व जनता वसाहत अग्निशामक दलाचे गाडी घटनास्थळी दाखल झाली.

– लाभांश न देण्याचे बँकांवर बंधन; रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग क्षेत्राची पुन्हा निराशा

अग्निशमन दलाच्या जवानंकडून रात्री आठ वाजेपर्यंत मुलाचा शोध घेतला जात होता. मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येऊ लागल्याने जवानांनी शोध थांबविला.

– Lockdown : नगरच्या ‘एसपीं’ना भावला नाकाबंदीचा ‘पुणेरी पॅटर्न’!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply