kinwat today news
video-:-राज्यातील-कापूस-खरेदीस-हिरवा-कंदील

Video : राज्यातील कापूस खरेदीस हिरवा कंदील

कऱ्हाड ः कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खाण्देशामधील शेतकऱ्यांची कापूस खरेदी थांबली होती. येत्या सोमवारपासून (ता. 20) कापूस खरेदी सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सीग पाळून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना केल्याची माहीती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात कापूस महत्वाचे पीक असून विदर्भ, मराठवाडा, खाण्देश व पश्‍चिम महाराष्‍ट्रातील दुष्‍काळी भागात प्रामुख्याने ते पीक घेतले जाते. तेथील सर्वसामान्य शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण त्यावर अवलंबून असते. यंदा कापसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन झाले आहे. कापूस फेडरेशन व सीसीआयच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली. मात्र कोरोनाचे संकटामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना तेथे येणे शक्य नसल्याने कापूस खरेदी थांबली. दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढत असताना शेतीपूरक व्यवसायांना मुभा देण्याची केंद्र व राज्याची सुरवातीपासूनच भूमिका राहीली आहे. औषधे दुकानांसह ते उत्पादन करणाऱ्या कारखान्यानाही यात मुभा दिली आहे.
 
ते म्हणाले, कापूस खरेदीसाठी मुंबई येथे आज पणनची बैठक झाली. त्यात 20 एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. विदर्भ, मराठवाडी, खान्देशमधील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सींगचा वापर करून त्या- त्या जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करावी. शेतकऱ्यांनीही चांगल्या प्रतिचा कापूस केंद्रावर आणावा, त्यासाठीचे नियोजन करावे. त्यासाठी कापूस खरेदी केंद्र, स्थानिक बाजार समित्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. जे शेतकरी ऑनलाईन बुकींग किंवा दूरध्वनीवरून कळवणार आहेत, त्यांना कोणत्या वेळी केंद्रावर कापूस आणावा याबाबच्या सूचना देण्याबाबत सांगितले आहे. केंद्रावर येणाऱ्या कापसाची प्रत तपासून तो खरेदी केला जाईल. त्यानंतर पुढची प्रक्रीया केली जाईल. लॉकडाऊनमुळे  उन्हाळ्याच्या दिवसातही शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला आहे, तो खरेदी झाला पाहीजे, ही शासनाची भूमिका आहे. 61 तालुक्यात 74 कापूस खरेदी केंद्रे आहेत. सोमवारी पहिल्या टप्प्यात यातील काही केंद्रावर खरेदीस सुरवात होईल. त्यापाठोपाठ अन्य केंद्रावरही खरेदी प्रक्रीया सुरू होईल.
 
जिनींग मिलमधील कामगारांच्या उपलब्धतेबाबतच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, बहुतेक कामगार हे छतीसगड राज्यातील आहेत. मात्र काही स्थानिक कामगारही आहेत. अनेक कामगार छतीसगडला गेले असले तरी न गेलेल्यासह स्थानिक कामगारांच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना बोलवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मिल सुरू झाल्यानंतर स्थानिक कामगारही येतील.  

उद्धव साहेब, कापूस खरेदी सुरू करा; शेतकरी महिलेची साद

कापूस घरातच पिवळा पडण्याचा धोका

कोरोना इफेक्ट : पाच लाख क्विंटल कपाशीच्या होणार वाती

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला सरसाला पणन महासंघ, लवकरच देणार चुकारे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply