kinwat today news
चिंताजनक-:-धोकादायक-इमारतीतील-रहिवाशांनी-नोटीसच-घेतली-नाही!

चिंताजनक : धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी नोटीसच घेतली नाही!

खडकी बाजार Pune : वाकडेवाडी येथील संभाजीनगर पीएमसी कॉलनीमधील धोकादायक बनलेल्या ३ इमारतींमधील रहिवाशांना पुणे महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसनच्या वतीने नोटीस देण्यात येत होती. घरे त्वरीत खाली करण्यासंबंधी नोटीस देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पाहून संतापलेल्या रहिवाशांनी नोटीस न घेता परत पाठविले या वेळी कॉलनीत मोठी गर्दी जमा झाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गर्दी वाढत असल्याचे पाहून पीएमसी कर्मचारी काही घरांना नोटीस चिटकवून परतले. या वेळी सोशल डिस्टनसिंगला मात्र हरताळ फासला गेला. पीएमसी कॉलनी येथील इमारती धोकादायक असल्याचे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट महापालिकेकडे आला असल्यामुळे तसेच, पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असल्यामुळे आम्ही येथील घरांना नोटीस देण्यासाठी आलो होतो असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळला सांगितले.                     

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकडेवाडी येथील काही इमारती खूप धोकादायक बनल्या आहेत महापालिकेने त्याचे स्ट्रक्चर ऑडिट केले आहे. येथील रहिवाश्याना आम्ही तात्पुरते बाणेर येथे चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतर करणार आहोत.
– अविनाश सकपाळ, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन पुणे महापालिका

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply