kinwat today news
धक्‍कादायक-ब्रेकिंग-!-दिव्यांग-अन्‌-ज्येष्ठ-नागरिकांसाठीची-हेल्पलाईनच-निराधार 

धक्‍कादायक ब्रेकिंग ! दिव्यांग अन्‌ ज्येष्ठ नागरिकांसाठीची हेल्पलाईनच निराधार 

सोलापूर : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांनाच असल्याने त्यांना घरपोच सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समाजकल्याण विभागातर्फे स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन कागदोपत्री केले. मात्र, धान्य अथवा किरणा मालासाठी शेजारील व्यक्‍तीला घेऊन जा, दुकाने बंद झाल्यानंतर कॉल करा, असे सल्ले दिले जात असल्याचा अनुभव शुक्रवारी (ता. 17) सकाळने घेतला. 

हेही नक्‍की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेबाबत मोठा निर्णय ! थेट तिसऱ्या वर्षीच्याच होणार परीक्षा 

 

सोलापूर शहर-जिल्ह्यात किती निराधार दिव्यांग व एकाकी ज्येष्ठ नागरिक आहेत अथवा एकूण दिव्यांग तथा ज्येष्ठ नागरिकांची अपडेट संख्या समाजकल्याण विभागाकडे नसल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्‍त कैलास आढे यांनी सांगितले. मात्र, हेल्पलाईनवर संपर्क केलेल्या प्रत्येक निराधार व्यक्‍तीला घरपोच सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आश्रम शाळांमधील 75 तर दिव्यांगांच्या शाळांमधील 20 मुख्याध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. ज्यांना उत्पन्नाचा काही स्त्रोत नाही, निराधार, एकाकी आहेत त्यांनाच घरपोच सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तर बहूतांश निराधारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोफत धान्यही दिले जात आहे. मात्र, कुर्डूवाडीतून एकाच दिव्यांग व्यक्‍तीचा कॉल आल्याचे तेथील नियुक्‍त कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले तर काही मुख्याध्यापकांनी संपर्क करुनही उत्तर दिले नाही. संपर्क करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने निराधार घराबाहेर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

हेही नक्‍की वाचा : इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची उपासमार 

 

आतापर्यंत 370 व्यक्‍तींना घरपोच सेवा 
सोलापूर शहर-जिल्ह्यातील एकाकी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची लॉकडाउन काळात सोय व्हावी यासाठी समाजकल्याणचे सहायक आयुक्‍त कैलास आढे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. गरजूंपर्यंत सेवा पोहचावी या हेतूने 95 मुख्याध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाने 0217- 2734950 हा हेल्पलाइन क्रमांक दिला असून प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी व शहरासाठी स्वतंत्र मुख्याध्यापकांची नियुक्‍ती केली आहे. आतापर्यंत 95 दिव्यांग तर 275 ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिल्याची माहिती सहायक आयुक्‍त कैलास आढे यांनी दिली. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply