kinwat today news
….-तर-संपूर्ण-अशोक-चौक-परिसर-भस्मसात-झाला-असता

…. तर संपूर्ण अशोक चौक परिसर भस्मसात झाला असता

सोलापूर :  सूरतहून बंगळूरकडे जाणाऱ्या गॅस वाहतूक टॅंकरवरील टाकीचे लॉक शांती चौकात उघडले. त्यामुळे त्यातून गॅस बाहेर पडण्यास सुरवात झाली. ही बाब लक्षात आल्यावर हा टॅंकर अशोक चौकात थांबविण्यात आला. तोपर्यंत सुमारे तीन टन गॅस टाकीच्या बाहेर पडून तो सर्वत्र पसरला होता.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, सेल्फि आणि जवळून

हे ही वाचा ः अग्निशमन मालिका भाग – ०१

लॉक पुन्हा बंद नाही केला तर मोठी दुर्घटना होईल याची खात्री झाल्याने माझ्यासह रेवणसिद्ध मायनाळे आणि अर्जुन पवार तिघे टॅंकरवर चढलो. कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊन आमचे प्राणही जाऊ शकले असते ही जाणीव असतानाही कर्तव्य महत्त्वाचे मानले आणि अतिशय प्रयत्नाने गॅस टाकीचे उघडलेले लॉक बंद केले. लॉक बंद न करताच टॅंकर आणखी काही अंतरावर गेला असता आणि विजेच्या तारांना स्पर्श झाला असता किंवा कशाची तरी ठिणगी पडली असती तर संपूर्ण अशोक चौक परिसर काही क्षणात भस्मसात झाला असता….ज्येष्ठ फायरमन सिद्धाराम अडगळे यांचा हा अनुभव एकूणच अग्निशमन दलातील जबाबदारी व कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे.

हे ही वाचा ः अग्निशमन मालिका भाग – ०२

श्री. अडगळे व श्री. मायनाळे हे एकाच वाहनावर गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. अनेक आगी त्यांनी विझवल्या आहेत. अनेक भयानक घटनांना ते एकत्रित सामोरे गेले आहेत. त्यामुळे दलामध्ये ही दुक्कल “जीवा-शिवाची’ जोडी म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्यांच्या जोडीला चालक मोहन मुडके यांचाही सहभाग अनेकवेळा असतो.

हे ही वाचा ः अग्निशमन मालिका भाग – ०३

अशोक चौकातील घटना आठवली की अंगावर सर्रकन काटा येतो, असे सांगून श्री. अडगळे म्हणाले, “”स्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने परिसरातील लोकांना घरातून, दुकानातून बाहेर काढले. पोलिसांच्या सहकार्याने जवळपास अशोक चौकातील बहुतांश परिसर निर्मनुष्य करण्यात आला. या टाकीमध्ये एकूण वीस टन गॅस होता. लॉक लिक झालेल्या स्थळापासून ते अशोक चौकापर्यंत टाकीतील तीन टन गॅस बाहेर पडला होता. लॉक बंद करण्यात यश मिळाल्याने आमच्या जीवात जीव आला. या कामगिरीमुळे खूष होऊन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या पगारावर नोकरीसाठी बंगळूरला बोलावले. मात्र “गड्या आपुला गाव बरा’ म्हणत आम्ही सोलापुरातच राहणे पसंत केले.”

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, टोपी आणि जवळून
सिद्धेश्‍वर मायनाळे

आषाढी यात्रा बंदोबस्ताच्या वेळी भीमा नदीच्या वाळवंटात टॅंकर घुसून एक ठार आणि एकोणीसजण जखमी झाले होते. त्यांना तातडीने दवाखान्यात नेणे गरजेचे होते. मात्र, त्यावेळी एकाही स्थानिक नागरिकाने मदत केली नाही. अग्निशमन दलाच्या वाहनातच त्या सर्वांना अर्धा किलोमीटरवर असलेल्या दवाखान्यात नेले व त्यांच्यावर तातडीने उपचार झाले. या जखमींना वेळेत नेले नसते तर त्यांच्या जीवावर बेतले असते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. एकोणीस जणांचा जीव वाचविण्यात यश आल्याने आम्हाला झालेल्या त्रासाचा विसर पडला, असेही श्री. अडगळे यांनी सांगितले.

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply