kinwat today news
तीन-किलो-तांदळात-काढा-महिना…शासनाचे-अजब-आदेश

तीन किलो तांदळात काढा महिना…शासनाचे अजब आदेश

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पोषण आहाराऐवजी महापालिका शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट तांदळाचा कोरडा शिधा दिला जाणार आहे. शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना एका महिन्यासाठी तीन किलो तांदूळ दिले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (ता. १७) सांगितले. 

कोरोना विषाणूचा धोका वाढताच राज्य शासनाने १४ मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २२ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. सेवाभावी संस्था, राजकीय व्यक्तींनी अन्नदान सुरू केले आहे. मात्र, ही मदत प्रत्येकापर्यंत पोचेल असे नाही. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांची तरी व्यवस्था व्हावी म्हणून पोषण आहार सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने पोषण आहार सुरू केला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इस्कॉनतर्फे खिचडी दिली जात होती.

मात्र, आता राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना तांदळाचा कोरडा शिधा दिला जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी सांगितले. तांदळासोबतच डाळही दिली जाणार आहे. मात्र, तूर्तास केवळ तांदूळच प्राप्‍त झालेले असल्याने सोमवारपासून एक महिन्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन किलो तांदूळ दिले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पालकांना करणार फोन 
विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून तांदूळ वाटप केले जाणार आहेत. यासाठी पालकांना फोन करून बोलावून घेतले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. हा तांदूळ घेण्यासाठी पालकांना घराबाहेर पडावे लागणार आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी – क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी  क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी – क्लिक करा

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply