kinwat today news
बापरे!-क्वारंटाईन-केले-होते-परप्रातिंयांना.भल्या-पहाटे-४-जण-पळालेच-कसे?-पोलीसही-संभ्रमात

बापरे! क्वारंटाईन केले होते परप्रातिंयांना..भल्या पहाटे ४ जण पळालेच कसे? पोलीसही संभ्रमात

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काठे गल्लीत निवारागृह तयार करण्यात आले आहे. येथे वास्तव्यास असलेल्या चार परप्रांतीयांनी शुक्रवारी (ता. 17) सकाळी सुमारे पाचच्या सुमारास पलायन केले. भद्रकाली पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा घडला प्रकार
मुंबई येथून घरी जाण्यासाठी निघालेल्या अनेक परप्रांतीय नागरिकांना ताब्यात घेऊन शहरातील वेगवेगळ्या निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. काठे गल्ली येथील निवारागृहातून शुक्रवारी (ता. 17) सकाळी सुमारे पाचच्या सुमारास चार परप्रांतीय नागरिकांनी निवारागृहाचे लोखंडी जाळीचे प्रवेशद्वार वाकवून पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस शिपाई जगेश्‍वर बोरसे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता. 17) सायंकाळी याच चौघांनी निवारागृहात गोंधळ घातला होता. तेथे वास्तव्यास असलेल्या अन्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या निवारागृहात सुमारे 40 जण वास्तव्यास आहेत. सर्वांना पुरेसा अन्नपुरवठा होत असला तरी ते अन्न घेण्यावरून नेहमी गोंधळ घालत होते, असे तेथील नागरिकांनी सांगितले.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो “तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले ‘एसीपी’ आम्ही आहोत”!

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply